Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगडमध्ये दोन चकमकींत 14 नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांत सुरक्षा दलांनी राबवलेल्या समन्वित मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. बस्तर रेंजमध्ये झाल

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद
उत्तरप्रदेशात आणखी एक एन्काउंटर
उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर

रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांत सुरक्षा दलांनी राबवलेल्या समन्वित मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. बस्तर रेंजमध्ये झालेल्या दोन स्वतंत्र चकमकींत एकूण 14 सशस्त्र नक्षलवादी ठार झाले असून, त्यांच्याकडून अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
सुरक्षा यंत्रणांना दक्षिण छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हालचालींबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड)च्या विशेष पथकांना जंगल परिसरात रवाना करण्यात आले. सुकमा जिल्ह्यातील कोंटा-किस्ताराम भागातील जंगलात सकाळी सुमारे आठच्या सुमारास सुरू झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले. तर बीजापूर जिल्ह्यात पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या गोळीबारात आणखी दोन नक्षलवादी निष्प्रभ करण्यात आले.
चकमकीनंतर राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान घटनास्थळावरून एके-47, आयएनएसएएस, एसएलआर रायफल्ससह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, ठार झालेल्यांमध्ये काही कुख्यात नक्षलवादी असून, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव यांच्या हत्येप्रकरणात सहभागी असलेले सदस्यही या गटात होते.
या कारवाईत नक्षल कमांडर मंगडू ठार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. तसेच कोंटा एरिया कमिटीचा सक्रिय सदस्य हितेश याचाही मृतांमध्ये समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी केले. सध्या दोन्ही जिल्ह्यांतील जंगल परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू असून, नक्षल जाळ्याचे उर्वरित धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र व राज्य सरकारने या यशस्वी कारवाईबद्दल सुरक्षा दलांचे अभिनंदन करत, नक्षलवाद निर्मूलनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे स्पष्ट केले आहे.

COMMENTS