देवळाली पानाची येथे 6 ते 13 जानेवारीदरम्यान शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहकडा । प्रतिनिधीआष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे सालाबादप्रमाण

देवळाली पानाची येथे 6 ते 13 जानेवारीदरम्यान शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह
कडा । प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे सालाबादप्रमाणे प.पू. ब्र.भू. सद्गुरू श्री स्वामी चैतन्यानंद महाराज यांचा 55 वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा होणार असून, मंगळवार दि. 6 जानेवारी ते मंगळवार दि. 13 जानेवारी 2026 या कालावधीत श्री शिवमहापुराण कथा (संगीत) व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता प.पू. श्री चैतन्यानंद स्वामींची प्रतिमा, ग्रंथ तसेच शिवमहापुराण कथा प्रवक्ते ह.भ.प. मंगेश महाराज दाताळकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर संत-महंत व मान्यवरांच्या हस्ते वीणापूजन होऊन पुण्यतिथी सोहळ्याचा विधिवत प्रारंभ होईल. पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 8 विष्णुसहस्त्रनाम, गीता अध्याय, प्रार्थना व पसायदान, 8 ते 8.30 संतपूजा, सकाळी 10 ते 11 गाथा भजन, दुपारी 1 ते 5 श्री शिवमहापुराण कथा ह.भ.प. मंगेश महाराज दाताळकर यांच्या रसाळ वाणीतून संपन्न होईल. सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 7.30 ते 8 नामजप, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर होईल. दि. 6 जानेवारी : ह.भ.प. भगवान महाराज मते (हरेश्वर संस्थान, चिचोंडी शिराळ), दि. 7 जानेवारी : ह.भ.प. माऊली महाराज कराळे (श्री क्षेत्र गव्हाणे बाबा समाधीस्थळ, करंजी घाट), दि. 8 जानेवारी : ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड (सद्गुरू मठ, मेहेकरी – अंजनीगड), दि. 9 जानेवारी : ह.भ.प. उमेश महाराज दशरथे (वारकरी भूषण, आळंदी), दि. 10 जानेवारी : ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर), दि. 11 जानेवारी : युवा कीर्तनकार ह.भ.प. सोपान महाराज कनेरकर, दि. 12 जानेवारी : ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर मंगळवार दि. 13 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 ह.भ.प. मंगेश महाराज दाताळकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर स्वामींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीत चैतन्य स्वामी भजनी मंडळ तसेच विविध शाळांचे लेझीम पथक सहभागी होणार आहेत. काल्याच्या महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल. या पुण्यतिथी सोहळ्यास महाराष्ट्रातील अनेक संत, महंत तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व भाविकांनी या सप्ताहास उपस्थित राहून श्री शिवमहापुराण कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवळाली ग्रामस्थांनी केले आहे.

COMMENTS