Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून घुसखोरीचा प्रयत्न

नियंत्रण रषेवरील खडी सेक्टरमध्ये ड्रोनद्वारे टाकली संशयास्पद बॅगश्रीनगर ः नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारत-पाकिस्त

जागतिक पातळीवर भारताचा डंका
अफगाणिस्थानात होणार क्रिकेट मालिका… ‘हा’ संघ दौरा करण्याची शक्यता
पाकिस्तानात क्रूरतेचा कळस.

नियंत्रण रषेवरील खडी सेक्टरमध्ये ड्रोनद्वारे टाकली संशयास्पद बॅग
श्रीनगर ः नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील खडी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा एक नापाक प्रयत्न उघडकीस आला आहे. सीमा पारून एका ड्रोनच्या माध्यमातून संशयास्पद बॅग टाकण्यात आली होती. ही हालचाल लक्षात येताच नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या सतर्क जवानांनी तत्काळ कारवाई करत पहाटे इतर सुरक्षा दलांसोबत संयुक्त शोधमोहीम सुरू केली.या संयुक्त कारवाईत लष्कर, एसओजी (स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप) आणि पोलीस दलाचे जवान सहभागी होते.
शोधमोहीमेदरम्यान पुलस्त्य नदीत ड्रोनद्वारे टाकण्यात आलेली ती बॅग जप्त करण्यात यश आले. बॅगची तपासणी केली असता त्यात तीन पाकिटे आढळून आली. या पाकिटांमध्ये अंमली पदार्थ, गोळ्या आणि एक आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस) सापडले आहेत. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची सखोल तपासणी सुरू असून त्याचा स्रोत आणि उद्देश शोधला जात आहे. ही घटना अशा वेळी घडली, जेव्हा पाकिस्तान किंवा सीमा पार सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांकडून कोणतीतरी नापाक कारवाई होण्याची गुप्तचर माहिती सुरक्षा दलांना आधीच मिळाली होती. या इनपुटमुळे सुरक्षा दल उच्च सतर्कतेवर होते आणि विशेष दक्षता घेत होते.याच सतर्कतेमुळे आणि जलद कारवाईमुळे घुसखोरी करण्याचा एक नापाक प्रयत्न घटना उधळून लावण्यात यश आले असून मोठा धोका टळला आहे. या घटनेमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सखोल तपास करत आहेत.

COMMENTS