Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगावातील इतिहास हा मानवतेचा : प्रकाश आंबेडकर

शिक्रापूर / प्रतिनिधी : कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी शासनाकडून नागरिकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. कोरेगावातील

स्वच्छ सर्वेक्षणात मलकापूर शहर पश्‍चिम भारतात 8 व्या स्थानी
महाराष्ट्रात येणारे मोठे उद्योग गुराजतला कसे गेले : राजवर्धन पाटील
शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; राजकीय वादातून हल्ला झाल्याची चर्चा

शिक्रापूर / प्रतिनिधी : कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी शासनाकडून नागरिकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. कोरेगावातील इतिहास हा मानवतेचा इतिहास असून येथील लढ्यामुळे भारताच्या पर्वाची सुरुवात झाली. येथील लढा हा जातीप्रथेच्या अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधात होता, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथे एक जानेवारी शौर्यदिनी अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. यावेळी बोलताना शासनाने येथील केलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पालिका निवडणुकांबाबत बोलताना आमच्याकडून पक्षाच्या बाहेरील उमेदवारांना संधी देण्यात आलेली नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात आल्याचे सांगत मुंबई महापालिकेतील जागा वाटपाबाबत काँग्रेसने आम्हाला जास्त जागा दिल्या. ज्या ठिकाणी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार होते त्या जागा त्यांच्याकडे ठेवण्यात आल्या. ज्या ठिकाणी आमच्याकडे मजबूत उमेदवार होते त्या जागा आम्ही घेतल्या नसल्याचे देखील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

COMMENTS