Homeमहाराष्ट्रअहमदनगर

‘न्यू आर्ट्स’मध्ये मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबीर 

शेवगाव : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव येथील प्राणीशास्त्र विभाग, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे तसेच युगंधर फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले.  शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख प्रशिक्षक प्रा. रेश्मा माने व प्रमुख पाहुणे प्रा. दत्तात्रय चौगुले उपस्थित होते. प्रा. रेश्मा माने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मधमाशी पालनाचे शास्त्रीय महत्त्व, त्याची उपयुक्तता तसेच जैवविविधतेच्या संवर्धनातील भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली. प्रा. दत्तात्रय चौगुले यांनी मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाची गरज अधोरेखित करत रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने त्याचे महत्त्व विशद केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी पृथ्वीवरील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मधमाशी पालन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.  या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. उषा शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने करण्यात आली. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  शिबिराचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.सचिन पवार यांनी केले. कार्यक्रमास भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. विजय देवरे, क्रीडा संचालक डॉ.डी.एम.लोखंडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. छाया भालशंकर, प्रा. मिनाक्षी चक्रे यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.संतोष उगलमुगले, प्रा.सुशीलकुमार शिंदे, प्रा.दत्तात्रय भुसारी, प्रा.संतोष बंगरे, प्रा.अल्ताफ शेख, शरद तुपविहीरे, सोमनाथ ससे, सचिन चव्हाण आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा मालुसरे व किरण साळवे यांनी केले, तर आभार  प्रा.मृणाली जाधव यांनी मानले.

शेवगामध्ये ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू
कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रात मोठे योगदान ; डॉ. राऊत
ग्रामसभेचे ठराव डावलल्याचा आरोप

शेवगाव : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव येथील प्राणीशास्त्र विभाग, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे तसेच युगंधर फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

 शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख प्रशिक्षक प्रा. रेश्मा माने व प्रमुख पाहुणे प्रा. दत्तात्रय चौगुले उपस्थित होते. प्रा. रेश्मा माने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मधमाशी पालनाचे शास्त्रीय महत्त्व, त्याची उपयुक्तता तसेच जैवविविधतेच्या संवर्धनातील भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली. प्रा. दत्तात्रय चौगुले यांनी मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाची गरज अधोरेखित करत रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने त्याचे महत्त्व विशद केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी पृथ्वीवरील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मधमाशी पालन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

 या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. उषा शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने करण्यात आली. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

 शिबिराचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.सचिन पवार यांनी केले. कार्यक्रमास भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. विजय देवरे, क्रीडा संचालक डॉ.डी.एम.लोखंडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. छाया भालशंकर, प्रा. मिनाक्षी चक्रे यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.संतोष उगलमुगले, प्रा.सुशीलकुमार शिंदे, प्रा.दत्तात्रय भुसारी, प्रा.संतोष बंगरे, प्रा.अल्ताफ शेख, शरद तुपविहीरे, सोमनाथ ससे, सचिन चव्हाण आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा मालुसरे व किरण साळवे यांनी केले, तर आभार  प्रा.मृणाली जाधव यांनी मानले.

COMMENTS