भातकुडगाव फाटा : आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी, बोधेगाव (शेवगाव) यांच्या वतीने प्रवेश जनजागृती अभियान २०२६ अंतर्गत परिसरातील विविध कनिष्ठ महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांचे महाविद्यालयामध्ये क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. ३० डिसेंबर रोजी महाविद्यालयात शहरटाकळी विद्यालय शहरटाकळी यांचे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या भेटीत १२ वी विज्ञान शाखेचे ३४ विद्यार्थी व ३ शिक्षक सहभागी झाले होते. या क्षेत्रभेटींचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना बी. फार्मसी व डी फार्मसी तसेच बीसीएस व बीसीए अभ्यासक्रमाची माहिती, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा तसेच फार्मसी व संगणक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे हा होता. या उपक्रमादरम्यान माहितीपत्रके वितरित करण्यात आली तसेच महाविद्यालयाच्या सुविधा, प्रयोगशाळा, प्रशिक्षित प्राध्यापकवर्ग आणि उद्योगाभिमुख शिक्षण पद्धती यांची सविस्तर माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व उच्च शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ हेमंत गांगुर्डे यांनी यावेळी दिली. प्रवेश जनजागृती अभियान २०२६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले. अशी माहिती शहरटाकळी विद्यालयाचे प्राचार्य ढोले यांनी यावेळी दिली. संस्थेचे सेक्रेटरी डॉ.विद्यारधर काकडे, माजी जि.प.सदस्य हर्षदा काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मणराव बीटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंग काकडे, कॅम्पस डायरेक्टर भाग्यश्री पाटील यांनी सदर उपक्रमाबाबत प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे व राजेश मोकाटे तसेच सर्व प्राध्यापकांचे कौतुक केले.

भातकुडगाव फाटा : आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी, बोधेगाव (शेवगाव) यांच्या वतीने प्रवेश जनजागृती अभियान २०२६ अंतर्गत परिसरातील विविध कनिष्ठ महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांचे महाविद्यालयामध्ये क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. ३० डिसेंबर रोजी महाविद्यालयात शहरटाकळी विद्यालय शहरटाकळी यांचे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या भेटीत १२ वी विज्ञान शाखेचे ३४ विद्यार्थी व ३ शिक्षक सहभागी झाले होते. या क्षेत्रभेटींचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना बी. फार्मसी व डी फार्मसी तसेच बीसीएस व बीसीए अभ्यासक्रमाची माहिती, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा तसेच फार्मसी व संगणक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
या उपक्रमादरम्यान माहितीपत्रके वितरित करण्यात आली तसेच महाविद्यालयाच्या सुविधा, प्रयोगशाळा, प्रशिक्षित प्राध्यापकवर्ग आणि उद्योगाभिमुख शिक्षण पद्धती यांची सविस्तर माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व उच्च शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ हेमंत गांगुर्डे यांनी यावेळी दिली. प्रवेश जनजागृती अभियान २०२६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले. अशी माहिती शहरटाकळी विद्यालयाचे प्राचार्य ढोले यांनी यावेळी दिली.
संस्थेचे सेक्रेटरी डॉ.विद्यारधर काकडे, माजी जि.प.सदस्य हर्षदा काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मणराव बीटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंग काकडे, कॅम्पस डायरेक्टर भाग्यश्री पाटील यांनी सदर उपक्रमाबाबत प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे व राजेश मोकाटे तसेच सर्व प्राध्यापकांचे कौतुक केले.

COMMENTS