Homeमहाराष्ट्रअहमदनगर

नववर्षात प्रत्येकाची संकल्प पूर्ती व्हावी : माजी मंत्री थोरात 

संगमनेर : भूतकाळ हा भविष्यकाळाचा मार्गदर्शक असून प्रत्येक नवीन दिवस आणि नवीन वर्ष नवी आशा, नवी ऊर्जा घेऊन येतो. त्याप्रमाणे येणारे नवीन वर्ष 2026

मोठी घडामोड… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री थोरात गेले फडणवीसांच्या भेटीला
लाडकी बहीण योजनेचा राजकीय प्रचार सरकारी खर्चाने
संगमनेरची शांतता बिघडवणार्‍यांना यशस्वी होऊ देऊ नका

संगमनेर : भूतकाळ हा भविष्यकाळाचा मार्गदर्शक असून प्रत्येक नवीन दिवस आणि नवीन वर्ष नवी आशा, नवी ऊर्जा घेऊन येतो. त्याप्रमाणे येणारे नवीन वर्ष 2026 हे प्रत्येकासाठी आरोग्यदायी, आनंदाचे, सुख समृद्धीचे जाऊन नवीन वर्षात प्रत्येकाची संकल्पपूर्ती व्हावी अशा शुभेच्छा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भूतकाळ हा प्रत्येकाचा मार्गदर्शक असून त्यावर भविष्याची वाटचाल ही ठरलेली असते. नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला चांगले आरोग्याबरोबर चांगले जीवनमान मिळावे यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. मागील वर्षात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या आहेत. वाईट गोष्टी परत घडणार नाही काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. आपले गाव शहर तालुका राज्य देश चांगला घडवण्यासाठी प्रत्येकाने एक चांगला संकल्प करावा.

सामाजिक बांधिलकी ठेवत संविधानाचा आणि लोकशाहीचा विचार जपत राष्ट्रहितासाठी काम करावे. मानवता हा धर्म सर्वात मोठा असून संत व समाज सुधारकांचे विचार घेऊन काम करावे. येणारे वर्ष 2026 हे सर्वांना आनंदाचे आणि संकल्पपूर्तीसह आनंददायी जावो अशा शुभेच्छा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.

आगामी 2026 या नवीन वर्षात प्रत्येकाच्या हातून राष्ट्रहिताचे काम व्हावे. निरोगी समाज निर्मितीसाठी विज्ञाननिष्ठ विचार घेऊन युवकांनी समाजाच्या विकासासाठी काम करावे. या वर्षात प्रत्येक नागरिकास समृद्ध आरोग्य आनंदी जीवनाबरोबर नवीन वर्ष यशस्वी जावो आणि नवीन वर्षात प्रत्येकाने चांगला संकल्प करून सकारात्मक व पुरोगामी विचार वाढीस लावावा अशा शुभेच्छा माजी आ. तांबे यांनी दिल्या.

COMMENTS