Homeमहाराष्ट्रबुलढाणा

बुलढाणा अर्बन बँकेच्या केज शाखेत रात्री उशिरापर्यंत ठेवीदारांची गर्दी

पोलिस बंदोबस्तात ठेवी परत देण्यासाठी बँक सुरू; बँक बंद पडण्याची अफवा की वास्तव? नागरिकांमध्ये संभ्रमकेज । प्रतिनिधीकेज शहरातील बुलढाणा अर्बन बँकेच

आ.नमिताताई मुंदडा यांच्या निधीतून शिरपुर्यात सभामंडपाचे भूमिपूजन; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
विकासपर्वाचा वेग! जीवाचीवाडी ते रानुबाईचीवाडी रस्त्याचे काम युद्धपातळीवर
क्रांतीनगरमध्ये उत्साहपूर्ण हळदी-कुंकू सोहळा

पोलिस बंदोबस्तात ठेवी परत देण्यासाठी बँक सुरू; बँक बंद पडण्याची अफवा की वास्तव? नागरिकांमध्ये संभ्रम
केज । प्रतिनिधी
केज शहरातील बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने एकच खळबळ उडाली. बँक बंद पडणार असल्याच्या चर्चांनी शहरात वार्‍याच्या वेगाने प्रसार घेतल्याने घाबरलेल्या ठेवीदारांनी आपापल्या ठेवी काढण्यासाठी बँकेसमोर गर्दी केली.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला पाचारण करण्यात आले. पोलिस बंदोबस्तात ठेवीदारांना पैसे देण्यासाठी बँक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. मात्र बँक नेमकी किती वाजेपर्यंत सुरू राहणार होती, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. बँक बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ही चर्चा अफवा आहे की त्यामागे काही तथ्य आहे, याबाबत बँकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, अशी ठेवीदार व नागरिकांची भावना होती. ठेवीदारांना विश्वासात घेऊन स्पष्ट माहिती देणे हे बँक प्रशासनाचे कर्तव्य असताना, तसे न केल्याने जनसामान्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढल्याचे चित्र दिसून आले. परिणामी, केज शहरात बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून नागरिकांकडून अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी होत आहे.

COMMENTS