पुणे ः कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आल्याने, पुण्यातील गुंडगिरी संपवण्याच्या अजित पवारांच्या ठाम भूमिकेव

पुणे ः कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आल्याने, पुण्यातील गुंडगिरी संपवण्याच्या अजित पवारांच्या ठाम भूमिकेवर विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. गजा मारणे सध्या एका गंभीर मारहाण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असून, त्याचे नाव पुण्यातील गुंडगिरीशी जोडले गेले आहे. अशा पार्श्वभूमीवर त्याच्या पत्नीला सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याने या मुद्द्याचे निवडणुकीत राजकीय भांडवल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत असल्याने सर्वच राजकीय पक्षांत जोरदार हालचाली सुरू आहेत. याच धावपळीत राष्ट्रवादी काँग्रेसने गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री मारणे या पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असतील. त्यांना पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक राजकीय निरीक्षकांसह सामान्य नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गजा मारणे याला अलीकडेच कोथरूड परिसरात एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

COMMENTS