Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्यायग्रस्तांने सातार्‍यात घेतला झेंड्याच्या खांबाचा आधार

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय व लोकप्रतिनिधींच्या जागरूकतेने अनेकांना न्याय मिळत आहे. मिळवून दिला जात आहे. ही एक बाजू असली

कराड पालिका ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात कचरा गाड्या उभ्या
स्वच्छ सर्वेक्षणात मलकापूर शहर पश्‍चिम भारतात 8 व्या स्थानी
फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचा राजीनामा

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय व लोकप्रतिनिधींच्या जागरूकतेने अनेकांना न्याय मिळत आहे. मिळवून दिला जात आहे. ही एक बाजू असली तरी दुसर्‍या बाजूला अनेकांना आंदोलन करूनही न्याय मिळत नाही. सातार्‍यामध्ये सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रीय सन्मान असलेल्या ध्वजाच्या खांबावर चढून एका तरुणाने तासभर बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. त्याने सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या झेंड्याच्या खांबाचा आधार घेतल्याची चर्चा बघ्यांकडून सुरू झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय प्रतीक असलेल्या ध्वज उभारणीसाठी बारीक शिडी असलेला लोखंडी खांब उभारण्यात आला आहे. या खांबावर भरत शिवाजी यादव (वय 38 रा. सासपडे, ता. सातारा) नावाच्या तरुणाने घरगुती कारण व इतर कारणांमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेण्यासाठी शोले स्टाईल पाण्याच्या टाकीवर नव्हे तर झेंड्याच्या खांबावर उभे राहून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. यामुळे सातारा जिल्हा प्रशासनामध्ये ही खळबळ माजली. अनेकांनी विनंती केल्या सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावली. आपत्ती व्यवस्थापन समितीचे देविदास ताम्हाणे, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांसोबत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या अनेकांनी त्याला मानवता भावनेतून खांबावरून खाली उतरण्यासाठी विनंती केली. परंतू, त्याने त्याकडे काही काळासाठी दुर्लक्ष केले.
सातारा पोलीस यंत्रणेने संयम राखून त्याला खाली उतरवण्यासाठी प्रतीक्षा केली. दुपारी सव्वाबारा वाजता त्याचा खांबावरील हात अवघडला व अश्रू अनावर झाल्यामुळे त्याने आपली व्यथा मांडली व खाली उतरण्याचा निर्णय घेतला. या वेळेला त्याला न्याय मिळालाच पाहिजे. असा जयघोष करण्यात आला. उपजिल्हाधिकारी पाटील यांनी मायेने त्या अन्यायग्रस्त तरुणाच्या खांद्यावर हात टाकून त्याला आपल्या दालनात घेऊन गेले. परंतु पुढे काय झाले? हे कुणालाच समजू शकले नाही. त्याबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी कोणीही दुपारपर्यंत पुढे आले नाही.

COMMENTS