Homeमहाराष्ट्रअहमदनगर

एलआयसी पॉलिसीवर परस्पर 10 लाखांचे कर्ज

अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील वाघा येथील शेतकरी महेंद्र बारस्कर यांनी घेतलेल्या एलआयसी पॉलिसीवर बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर 10 लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत एलआयसीच्या मुख्य कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली असून फसवणूक प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. अन्यथा आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी, शेतकरी बारस्कर यांनी दि. 15 नोव्हेंबर 2010 रोजी जामखेड येथील एलआयसी कार्यालयातून विमा पॉलिसी खरेदी केली होती. आतापर्यंत 1 लाख 17 हजार 600 रुपयांचे सुमारे 14 हप्ते भरले आहेत. 15 व्या हप्त्यासाठी दिलेला चेक रद्द करण्यात आल्याने त्यांनी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तुम्ही 10 लाखाचे कर्ज काढले असल्याचे सांगण्यात आले. बारस्कर यांनी बँक खात्याचे विवरण सादर करत कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नसल्याचे सांगितले. पण त्यांना अधिकार्‍यांकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले.    कर्मचारी व संबंधित एजंट यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली, माझ्या पॉलिसीवर बेकायदेशीर कर्ज उचलून आर्थिक अपहार केला आहे. याप्रकरणी संबंधित सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

अभय योजनेतून अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ग्राहकांना मिळणार लाभ
पिंपरी निर्मळ येथील गुन्ह्यातील 57 आरोपींना अटकपूर्व जामीन
अहमदनगर शहरात दहशतीचे वातावरण… सावेडीत जागा खाली करण्यासाठी गुंडांची दहशत

अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील वाघा येथील शेतकरी महेंद्र बारस्कर यांनी घेतलेल्या एलआयसी पॉलिसीवर बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर 10 लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत एलआयसीच्या मुख्य कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली असून फसवणूक प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. अन्यथा आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी, शेतकरी बारस्कर यांनी दि. 15 नोव्हेंबर 2010 रोजी जामखेड येथील एलआयसी कार्यालयातून विमा पॉलिसी खरेदी केली होती. आतापर्यंत 1 लाख 17 हजार 600 रुपयांचे सुमारे 14 हप्ते भरले आहेत. 15 व्या हप्त्यासाठी दिलेला चेक रद्द करण्यात आल्याने त्यांनी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तुम्ही 10 लाखाचे कर्ज काढले असल्याचे सांगण्यात आले. बारस्कर यांनी बँक खात्याचे विवरण सादर करत कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नसल्याचे सांगितले. पण त्यांना अधिकार्‍यांकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले.

   कर्मचारी व संबंधित एजंट यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली, माझ्या पॉलिसीवर बेकायदेशीर कर्ज उचलून आर्थिक अपहार केला आहे. याप्रकरणी संबंधित सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS