Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण-खटावला पाणी न दिल्यास उद्रेक अटळ : महेश करचे यांचा थेट इशारा

1 म्हसवड / वार्ताहर : माण-खटाव तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळाच्या गर्तेत अडकलेला असून, पाणी न मिळाल्यास येत्या काही दिवसांत शेती, पिण्याचे पाणी

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ
कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला
गोव्याहून राजस्थानच्या दिशेने जाणार्‍या खाजगी बसला भीषण अपघात; बसमधील चालकासह सहाजण जखमी

म्हसवड / वार्ताहर : माण-खटाव तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळाच्या गर्तेत अडकलेला असून, पाणी न मिळाल्यास येत्या काही दिवसांत शेती, पिण्याचे पाणी व पशुधनाचा प्रश्‍न स्फोटक रूप धारण करणार आहे. तरीही सिंचन प्रशासनाकडून पुन्हा एकदा माण-खटाववर अन्याय करण्याचीच तयारी सुरू आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केला आहे.
करचे यांनी अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन 15 जानेवारीपूर्वी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याची, तसेच टेल टू हेड पध्दतीने समन्यायी पाणीवाटप करण्याची ठाम मागणी केली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही कागदावर पाणी मंजूर दाखवून प्रत्यक्षात दुसरीकडे वळवण्याचा डाव सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, असे त्यांनी सांगितले.
माण-खटावच्या शेवटच्या टोकावरील पळसावडे, देवापूर, शिरताव, जांभुळणी, बनगरवाडी, गंगोती, पानवन, पुळकोटी, वळई, वडजल या गावांना दरवेळी पाणी नाकारले जाते. वरच्या भागाला पाणी देऊन शेवटच्या शेतकर्‍यांना वाळवंटात ढकलले जाते, या वस्तुस्थितीकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्षित करत असल्याचा आरोपही करचे यांनी केला.
30 एप्रिल 2025 रोजी म्हसवड येथे पाणी प्रश्‍नावर शेतकर्‍यांनी अर्धनग्न मोर्चा काढूनही प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. उलट त्या वेळी शेतकर्‍यांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून ते दुसर्‍याच भागात वळवण्यात आले. पाण्यापासून वंचित असणार्‍या गावांमध्ये जमावबंदी लागू करून शेतकर्‍यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला गेला. हा प्रकार म्हणजे प्रशासनाकडून उघड फसवणूक व दडपशाही असल्याचे करचे यांनी ठामपणे सांगितले.

COMMENTS