Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उसाचा ट्रॅक्टर गोपूजच्या पुलावरून कोसळला

गोपूज : पुलावरून कोसळलेला ऊसाचा ट्रॅक्टर. औंध / वार्ताहर : गोपूज, ता. खटाव येथील गावातील जाधव मळ्याला जाणार्‍या पुलावरून भरलेला ऊसाचा ट्रॅक्

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र अकॅडमीच्या दोन विद्यार्थिनींची निवड
त्रिपुडी येथील सोन्या नावाच्या चंद्रकोर बोकडाला 23 लाखाची बोली
खटाव तालुक्यातील येळीव तलावात माती माफियांचा रात्रं-दिवस धुडगूस

गोपूज : पुलावरून कोसळलेला ऊसाचा ट्रॅक्टर.

औंध / वार्ताहर : गोपूज, ता. खटाव येथील गावातील जाधव मळ्याला जाणार्‍या पुलावरून भरलेला ऊसाचा ट्रॅक्टर पुलावरून शनिवारी खाली गेला आहे. या घटनेत सुदैवाने चालक बचावला असून ट्रॅक्टर व शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयंत नानासो घार्गे (रा. गोपूज) यांच्या ऊसाची तोड सुरु आहे. कारखान्याकडे जाण्यासाठी ऊस ट्रॅक्टरमधून भरून पुलावर आल्यावर पुलाची उंची जास्त असल्याने उताराने ट्रॅक्टर न आवरल्याने उसाचा ट्रॅक्टर पुलाच्या डाव्या बाजूस कोसळला. यामध्ये प्रसंगावधान राखून चालकाने बाजूला उडी मारल्याने तो सुदैवाने बचावला आहे. या पुलाच्या कामाच्या सुरवातीपासूनच उंचीचा विषय ग्रामस्थांनी लावून धरला होता. मात्र, तत्कालीन अधिकार्‍यांनी गांभीर्याने न घेतल्याने आज ही घटना घडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळल्याचे कळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर काढण्याचे काम सुरु होते.
या पुलाच्या उंचीचा विषयावर एका अधिकार्‍याचे निलंबन सुध्दा झाले होते असे आमच्या ऐकण्यात आहे. यांच्या झालेल्या चुका आणि त्यामुळे आमच्या झालेल्या उसाचे नुकसान याला जबाबदार कोण याचे उत्तर आम्हाला प्रशासनाने द्यावे. अन्यथा हा पूल आम्ही ब्लास्टिंगने उडवून देऊ इतका वैताग आम्हाला आला आहे.
जयंत घार्गे
(नुकसानग्रस्त शेतकरी, गोपूज)

COMMENTS