Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड हादरले, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ; आत्महत्येचा संशय की घातपात?

मुदखेड (नांदेड) ः नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात घडलेल्या एका भीषण घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. एकाच कुटुंबातील चार ज

’लिव्ह इन’चा हट्ट धरणार्‍या तरुणीची हत्या
स्वच्छ व सुरक्षित सिंहस्थ कुंभमेळा यशस्वितेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार : क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

मुदखेड (नांदेड) ः नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात घडलेल्या एका भीषण घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून आत्महत्या की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत.
जवळा मुरार येथील लखे कुटुंबातील दोन सख्खे भाऊ बजरंग रमेश लखे (वय 22) व उमेश रमेश लखे (वय 25) यांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचवेळी त्यांच्या घरात वडील रमेश होनाजी लखे (वय 51) आणि आई राधाबाई रमेश लखे (वय 44) हे दोघे मृतावस्थेत आढळून आले. एकाच कुटुंबातील चार जणांचा असा एकाचवेळी मृत्यू झाल्याने ही घटना अधिकच गूढ बनली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथक, डॉग स्क्वॉड यांना पाचारण करण्यात आले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मयत उमेश लखे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुदखेड तालुक्याचे माजी उपाध्यक्ष होते. ते सामाजिक कार्यात सक्रिय असल्याची माहिती असून त्यांच्या अचानक मृत्यूने राजकीय व सामाजिक वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, बजरंग लखे, उमेश लखे, रमेश लखे आणि राधाबाई लखे या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. कुटुंबीयांचे कोणाशी वाद होते का, कौटुंबिक किंवा आर्थिक अडचणींमुळे हे पाऊल उचलण्यात आले का, की या प्रकरणामागे घातपाताचा संशय आहे. या सर्व बाबींचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

पोलीस तपासानंतरच होईल मृत्यूचे कारण स्पष्ट
प्राथमिक चौकशीत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे काही नागरिकांकडून समोर आले आहे. मात्र, अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवाल आणि सखोल पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल. घटनास्थळी पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडने तपास सुरू केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिली आहे.

COMMENTS