Homeताज्या बातम्या

अहिल्यानगर : पदोन्नती हा कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण: शैलेश मोरे

अहिल्यानगर : जिल्हा परिषद  लेखा कर्मचारी संघटना 1425, जिल्हा अहिल्यानगर  यांच्या पुढाकारातून  लेखा कर्मचाऱ्यांमधून राज्य शासन सेवेत लेखाधिकारी वर

आपल्या त्वचेला नुकसान करतात या 3 सवयी | LOKNews24
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला गती देणार
Displaying WhatsApp Image 2025-12-18 at 13.40.18_51039e93.jpg

अहिल्यानगर : जिल्हा परिषद  लेखा कर्मचारी संघटना 1425, जिल्हा अहिल्यानगर  यांच्या पुढाकारातून  लेखा कर्मचाऱ्यांमधून राज्य शासन सेवेत लेखाधिकारी वर्ग 2 पदी राघवेंद्र चव्हाण व   रवींद्र  पाबळकर  तसेच जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 8 कर्मचाऱ्यांना सहाय्यक लेखा अधिकारी पदी पदोन्नती मिळाली आहे. यात सुशील विधाते,  अशोक गाडगे,  बालिका गावित,  गजानन मुंडलिक,  राजेंद्र गायकवाड,  आनंद कुमार, प्रवीण मुनोत,  अशोक सांगळे यांचा समावेश आहे.  तसेच कनिष्ठ लेखा अधिकारी पदी 8 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. यात राजेश आंबेकर, सविता वाजे, अर्चना रासकर, दीपकसिंह परदेशी, अमोल राऊत, सुदाम बोंदर्डे, विलास वाघ व दिगंबर शिरसाट यांचा समावेश आहे.

      यानिमित्त लेखा संघटनेच्या वतीने पदोन्नती प्राप्त अधिकारी , कर्मचाऱ्यांचा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, लेखाधिकारी   संदीप बडे,  माणिक नागरे, राज्य उपाध्यक्ष राधेश्याम सपकाळे,तुषार खिलारी, यशवंतराव सालके,   संजय आगलवे,  राजेंद्र डोंगरे, विजय बर्डे, विजय कोरडे, विलास घायताडक, राज्य समन्वयक विकास साळुंके, अंबादास जमदाडे, सोनाली चेडे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी  आनंद भंडारी , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी   राहुल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पदोन्नती प्रक्रिया पार पडली. शैलेश मोरे म्हणाले की, नगर जिल्हा परिषद वित्त विभागाची कामगिरी सातत्यपूर्ण आणि चांगली‌ आहे. पदोन्नती हा कर्मचाऱ्यांच्या सेवा काळातील अतिशय आनंदाचा क्षण असतो. वित्त विभागातील सर्व पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. या प्रक्रियेसाठी संघटनेचा सातत्याने पाठपुरावा राहिला.

राजेंद्र म्हस्के म्हणाले की, पदोन्नतीसाठी संघटनेने यशस्वी पाठपुरावा केला आणि त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांसाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल संघटनेच्या वतीने म्हस्के यांनी आभार मानले. पदोन्नती प्राप्त झालेल्या एकूण 16 कर्मचाऱ्यांपैकी 8 सहायक लेखाधिकारी व 8 कनिष्ठ लेखाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद  येथील दोन सहायक लेखाधिकारी हे राज्य शासन सेवेत पदोन्नतीने कार्यरत झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दिगंबर शिरसाठ यांनी केले. तर विलास वाघ यांनी आभार मानले.

COMMENTS