Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विल्सन जिमखानावरून मराठी-जैन वाद चिघळण्याची शक्यता

मुंबई : पुण्यातील जैन बोर्डिंग वादावरून जैन समाज आक्रमक झाल्यानंतर या जागेची विक्री रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबईतील

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
उजनी धरणातून कालव्याद्वारे एक आवर्तन सिंचनासाठी देण्यात यावे
लातूर जिल्ह्यातील 56 केंद्रांवर 25673 विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ची परीक्षा

मुंबई : पुण्यातील जैन बोर्डिंग वादावरून जैन समाज आक्रमक झाल्यानंतर या जागेची विक्री रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबईतील मुंबईतील विल्सन जिमखाना या ऐतिहासिक जागेबाबत आता नवा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील विल्सन जिमखाना या जागेचे हक्क कोणाला द्यायचे यावरून मराठी संघटना आणि जैन संस्थेमध्ये संघर्षाचे संकेत दिसू लागले आहेत. आम्ही गिरगावकर, या संस्थेने जिल्हाधिकारी यांना पत्र देत स्पष्ट इशारा दिला आहे की, विल्सन जिमखानाचा भूखंड परप्रांतीयांची मालकी होऊ देणार नाही. हा भूखंड स्थानिक मुंबईकरांसाठीच राखून ठेवावा, असे त्यांचे मत आहे. यासोबतच, समाधानकारक निर्णय न घेतल्यास मोठे आंदोलन छेडण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे.

COMMENTS