Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दारू पिऊन गोंधळ घातला गुन्हा दाखल

कर्जत : शासकीय गावठाण मधील जमीन माझ्या नावावर करून का देत नाही असे म्हणत दारू पिऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गोंधळ घातला , शासकीय कामांमध्ये अडथ

एमआयडीसीतील विजेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आमी संघटना व महावितरणची बैठक
शिर्डीत बिऱ्हाड मोर्चा ; चुल पेटवुन स्वयंपाक बनवत आंदोलन
ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनात दर्जा, सौंदर्य, पर्यावरणाचा समतोल राखा : उपमुख्यमंत्री अजित पवार
Displaying 528335.jpg

कर्जत : शासकीय गावठाण मधील जमीन माझ्या नावावर करून का देत नाही असे म्हणत दारू पिऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गोंधळ घातला , शासकीय कामांमध्ये अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

  आज दिनांक 27 रोजी दुपारी दीड वाजता कानिफनाथ गहिनीनाथ धांडे या व्यक्तीने दारू पिऊन येऊन शासकीय गावठाण नेटकेवाडी येथील जमीन माझ्या नावावर करून का देत नाही असे म्हणत अरेरावेची भाषा करून कार्यालयातील दप्तर फेकून रजिस्टर फाडली व एकाला माझ्या गाडीखाली घालीन अशी धमकी देऊन शिवीगाळ करून ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्याच्या नावाचा कार्यालयीन शिक्का सोबत घेऊन जाण्याची घटना घडली आहे याप्रकरणी ग्रामपंचायती अधिकारी अंकुश सूर्यभान मुळे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये कानिफनाथ धांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत ग्रामपंचायत अधिकारी अंकुश मुळे यांनी पत्रकारांना माहिती दिली की दिनांक 27 तारखेला सकाळी दहा वाजता कुंभेफळ ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग होती यामुळे सरपंच व इतर पंच असे ग्रामपंचायतीच्या नेटकेवाडी येथे कार्यालयामध्ये जमले होते. दुपारी एक वाजता मासिक मीटिंग संपली यावेळी या बैठकीची दप्तरी नोंद करत असताना त्या ठिकाणी ग्रामपंचायत शिपाई परशुराम मच्छिंद्र भोगे,ग्राम रोजगार सेवक राजेश तुकाराम दोधाड, सरपंच प्रियांका संतोष धुमाळ व मी स्वतः ग्रामपंचायत अधिकारी अंकुश मुळे हे उपस्थित होते. यावेळी दुपारी दीड वाजता कानिफनाथ गहिनीनाथ धांडे हा दारू पिऊन कार्यालयामध्ये आला व मला म्हणाला की,मी मागितलेली माहिती तू का देत नाही, तुला मी सांगतो ती कामे करावी लागतील. नाहीतर मी तुला काम करू देणार नाही. नेटकेवाडी गावठाणातील असलेले शासकीय जमीन माझ्या नावावर करून का देत नाही. अशी आरेरावीची भाषा करून धमक्या देऊ लागला. त्यावेळी मी त्याला सरपंचाला भेटणे बाबत वरील सर अर्ज देणे बाबत सांगितले असता तो म्हणाला की मी सरपंच यांना मोजत नाही, मी सांगितल्याप्रमाणे तू काम कर माझ्या नावावर जमीन करून दे असे म्हणत कार्यालयातील दप्तर फेकून काही नोंदी व रजिस्टर फाडली व तुम्हाला एक एक आला माझ्या गाडीखाली घालीन अशी धमकी देऊन शिवीगाळ करून ग्रामपंचायत अधिकारी नावाचा कार्यालयीन शिक्का सोबत घेऊन गेला आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सोबत फोटो आहे 

COMMENTS