Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणच्या नाशिक परिमंडळात थकबाकी वसुली मोहीम राबवावी : कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांचे निर्देश

अहिल्यानगर : नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक अशा ४ लाख ११ हजार थकबाकीदार ग्राहकांकडे एकूण ५६ कोटी ३३ लाख र

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात आमदार काळेंची याचिका
संगमनेरमधील १८ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात ६ कोटी वर्ग ; काँग्रेसच्या पाठपुराव्यास यश
दुष्काळसदृष्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे
Displaying Hon Padalkar sir 21.11.2025 .jpeg

अहिल्यानगर : नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक अशा ४ लाख ११ हजार थकबाकीदार ग्राहकांकडे एकूण ५६ कोटी ३३ लाख रुपये वीज देयक थकबाकी आहे. ग्राहकांना गतिमान सेवा देण्यासाठी आणि योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी ही थकबाकी वसुली अत्यंत आवश्यक असल्याचे  स्पष्ट करीत कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होऊन ती यशस्वी करावी, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर यांनी केले. आज (शुक्रवार, दिनांक २१ नोव्हेंबर) नाशिक परिमंडळातील सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वीज देयक थकबाकी वसुलीसाठी तातडीने मोहीम सुरू करण्याचे त्यांनी  निर्देश दिले.

नाशिक येथील ऊर्जा व्यवस्थापन आणि प्रशिक्षण संस्था (PIPMT) येथील सभागृहात झालेल्या या बैठकीत ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांच्या पुनर्रचनेचा आढावा घेण्यात आला. आता ग्राहक सेवेसाठी देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी विभागणी करण्यात आली असून या माध्यमातून ग्राहकांना उत्कृष्ट व गतिमान सेवा मिळणार असून महावितरण कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण कमी होणार आहे.  सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवण्यासाठी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या कामाची माहिती घेऊन ग्राहकांना अखंडित वीज सेवा देण्यासोबतच वापरलेल्या विजेचे दरमहा अचूक वीजबिल देण्यावर त्यांनी भर दिला. सर्व वीज जोडणी तथा इतर सेवा ग्राहकांना तत्काळ व ठराविक वेळेतच दिल्या गेल्या पाहिजेत. यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करून प्रत्येक महिनाअखेर वीज देयकाची शून्य थकबाकी मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी केले. या बैठकीला नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधिक्षक अभियंता जगदीश इंगळे, रमेशकुमार पवार, देवेंद्र सायानेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे व हेमंत भामरे तसेच अहिल्यानगर नाशिक व मालेगाव मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS