Homeताज्या बातम्यासंपादकीय

नितीशकुमार भाजपला खिंडीत पकडण्याच्या बाहेर !

शाळा सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरला घेणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
पाण्यासाठी वडूजमध्ये नागरिकांचा रास्ता रोको; आठ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत
मुख्यमंत्री-राज्यपालांतला वाद सुरूच
 बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल या कमालीचे एकतर्फी लागले आहेत. महागठबंधन हे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससह इतर पक्षांचे असलेले गठबंधन हे बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांसह पुढे राहील, असं भाकीत जवळपास सर्वच राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलं होतं. अर्थात, एक्झिट पोल जे होते त्यांनी ११ नोव्हेंबरलाच एक्झिट पोलच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड ला कसं बहुमत मिळणार आहे, हे भाकीत केलं होतं. मात्र, त्यांनी केलेली भाकीतं ही खोटीच ठरली आहेत; कारण, त्यांनी जास्तीत जास्त दीडशे पर्यंत आणि त्याच्या आत महायुतीला रोखलेले होते. परंतु,  प्रत्यक्षात भाजप प्रणित महायुतीला मात्र दोनशेच्या पुढे म्हणजे २०८ जागा मिळाल्या आहेत. ऐतिहासिक बहुमत मिळवून, ज्याचा कुणी विचारही केला नव्हता; इतक्या संख्येने त्यांना जागा मिळाल्या आहेत! अर्थात, निवडणूक सुरू असताना प्रत्यक्षात राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या रॅलीत, संविधान यात्रात या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात युवक आणि महिलांची झुंबड उडाली होती. अर्थात, वातावरण ही त्यांच्या बाजूने असताना प्रत्यक्ष निवडणूक निकाल मात्र पूर्णपणे एकतर्फी लागले. या निकालावर माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते यशवंत सिन्हा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, जोपर्यंत निवडणूक आयोग पक्षपाती असेल, तोपर्यंत, विरोधी पक्षांनी आता निवडणुकाच लढवू नये! कारण, हा निकाल म्हणजे एक प्रकारे ठरवून दिलेला निकाल आहे. अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जनता दल युनायटेड चे नेते नितीशकुमार हे मुख्यमंत्री असतानाच्या काळात या निवडणुका झाल्या आहेत. परंतु, आता भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असल्याने तो आता सत्ता थेट आपल्या ताब्यात घेण्यास किंवा आपला मुख्यमंत्री बनविण्यासाठी उत्सुक आहे. हे बहुमताचे जे आकडे आहेत, याच्यामध्ये तुल्यबळ किंवा त्रिशंकू विधानसभा येईल असं तरी किमान भाकीत होतं. ज्यामुळे, आरजेडी आणि नितीश कुमार यांचे मिळून जर सरकार बनलं असतं तर; कदाचित नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाला खिंडीत पकडलं असतं! परंतु, तसं होऊ शकलेलं नाही! मुख्यमंत्री जनता दल युनायटेड चा असतानाही  भारतीय जनता पक्षाच्या जागा अधिक येणं म्हणजेच ९६% यशस्वीता प्रत्यक्ष निवडणुकीत मिळवणं, हे जवळजवळ अशक्य कोटीतले आव्हान, भारतीय जनता पक्षाने पेललेले आहे. अवघ्या १०१ जागा लढवल्या असतानाही त्यांना ९६ जागा मिळाल्या आहेत. हे मात्र आश्चर्यकारक आहे. अर्थात, या निवडणूक निकालाने देशातील सर्वांनाच धक्का दिलेला आहे. परंतु, निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आकडेवारी, जी महिलांचे मतदान हे पुरुषांपेक्षा आठ टक्क्यांनी अधिक आहे, असे सांगणारी आहे. त्यामध्ये बराच काही अर्थ दडलेला आहे. अर्थात, हजार पेक्षा कमी मतांनी ज्या जागा निवडून आलेल्या आहेत. अशा १२ जागा आहेत आणि या १२ जागा भाजपने नव्हे तर इतर पक्षांना गेलेले आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला ज्या जागा मिळाल्या आहेत त्या मोठ्या फरकाने आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये नेमकं काय झालं आहे, याच यथाअवकाश विश्लेषण होईल. आता निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे सध्या एनडीएची महायुती बिहारमध्ये निवडून आली आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड या दोन्ही पक्षांना जवळपास बरोबरीच्या जागा मिळाल्या असल्या तरी भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जागा मिळाल्या असल्याने, ते मुख्यमंत्रीपदावरचा आपला दावा सोडणार नाही! बिहार निवडणुकांचे  जे निकाल आहेत हे निकाल महाराष्ट्र विधानसभेच्या निकालांपेक्षा वेगळे नाहीत! त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळी समीकरणे नंतर बाहेर आली; तशी समीकरणं बिहारमध्ये येतील का, हा मोठा प्रश्न आहे!  एक निश्चित की, बिहारमध्ये कोणत्याही  राजकीय पक्षाची सत्ता असली तरी मुख्यमंत्री म्हणून मात्र ओबीसी उमेदवारच पुढे आणावा लागेल! यामध्ये कोणतीही शंका नाही. अर्थात, ओबीसींच्या हातात राजकीय सत्ता असली तरी आता दिल्लीहून रिमोट चालणार असल्यामुळे, बिहारमध्ये नितीश कुमार सारखं एक छत्री अंमल करणारी राज्य पद्धती करता येणार नाही. त्यामुळे, बिहारमध्ये नवे मुख्यमंत्री ओबीसी जरी असले तरी, ते दिल्लीच्या रिमोटवर अवलंबून असतील एवढं मात्र नक्की !

COMMENTS