Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉड्रीला आग लागून सुमारे 90 हजाराचे नुकसान

पाटण / प्रतिनिधी : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात असणार्‍या लॉन्ड्रीला मंगळवार, दि. 11 रोजी सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही
संगमनेर शेतकी संघाचा गुणवत्तेतून राज्यात प्रथम क्रमांक – आ. डॉ. तांबे
सातारच्या 10 औद्योगिक ग्राहकांची वीजचोरी उघडकीस

पाटण / प्रतिनिधी : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात असणार्‍या लॉन्ड्रीला मंगळवार, दि. 11 रोजी सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात दादा मोहन शिरसाट यांचे 87 हजार 200 रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दादा मोहन शिरसाट यांची पाटण शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात लाँड्री आहे. मंगळवार, दि. 11 रोजी सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या आतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यावेळी ग्रामस्थांनी तात्काळ मरळी, ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याच्या अग्नीशामक बंबास पाचारण केले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. दुकानामध्ये इस्त्रीसाठी आलेले कपडे असल्याने आग मोठी होत गेली. अग्नीशामक बंब आल्यानंतर दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत दुकानासह आतील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले होते.
या आगीत लाकडी टेबल, काउंटर, लाईट इस्त्री, दुकानातील लोकांची कपडे, शटर, खिडकी आदींसह सर्व दुकान जळून खाक झाले. आगीत 87 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सोपान टोम्पे व पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

COMMENTS