Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरुड ग्रामस्थ अन से-ट्रीज संस्थेचे काम कौतुकास्पद : ना. जयकुमार गोरे

वरुड सरोवरचे लोकार्पणऔंध / वार्ताहर : वरुड ग्रामस्थांची एकी व से-ट्रीज संस्थेच्या माध्यमातून वरुडकरांनी गावामध्ये मियावाकी जंगल तयार केले आहे.

विजयस्तंभासह वढुतही लोटला भीमसागर
18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात
आरोग्य सेवा न मिळाल्याने विवाहितेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निषकाळजीपणाचा दोन महिन्यांत दुसरा बळी

वरुड सरोवरचे लोकार्पण
औंध / वार्ताहर : वरुड ग्रामस्थांची एकी व से-ट्रीज संस्थेच्या माध्यमातून वरुडकरांनी गावामध्ये मियावाकी जंगल तयार केले आहे. यामुळे पर्यावरणाला खूप फायदा झाला आहे. वरूड येथील तलावाचे रूपांतर सरोवर म्हणून झाले आहे. ज्यामुळे जलसंधारणाच्या कामात मोठी मदत झाली आहे. या तलावामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. या कामामुळे इतरांनाही असे काम करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थ अन से-ट्रीज संस्थेचे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
वरूड येथील प्रति कास तलावाची संकल्पना अस्तित्वात आणून तयार केलेले वरूड सरोवरचे जलपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, उद्योजक अंकुश गोरे, से-ट्रिज संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कमांडर पयासी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राहुल देसाई, शशांक शर्मा, प्रा. बंडा गोडसे, सुधाकर बोबडे, सावता माळी, माजी सभापती संदीप मांडवे, धनंजय चव्हाण, नंदकुमार मोरे, तहसीलदार बाई माने, सोमनाथ भोसले, विशाल बागल, रामभाऊ पाटील, डॉ. विवेक देशमुख, भरत जाधव, नंदकुमार जोशी, शशिकांत मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, औंधचे सपोनि गणेश वाघमोडे, गटविकास अधिकारी योगेश कदम व वरुड ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS