Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशिक्षणाचा उपयोग ग्राहक सेवा आणि महावितरणच्या प्रगतीसाठी करा : संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन

नाशिक : महावितरणमध्ये प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या ज्ञान व कौशल्याचा वापर ग्राहकसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि कंपनीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करा

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री फडणवीस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुत करण्यासाठी तालुका, शहराध्यक्षाची निवड लवकरच -हरिहर भोसीकर
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलेतच व्हावे नागरिकांची मागणी; आदिवासी भागाची दुरवस्था मिटवण्याची मागणी
Displaying 1.jfif

नाशिक : महावितरणमध्ये प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या ज्ञान व कौशल्याचा वापर ग्राहकसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि कंपनीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करावा, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले. त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना “आपल्या कार्यातून स्वतःला एक आदर्श अभियंता म्हणून सिद्ध करा” असे आवाहन केले.ते शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्रात आयोजित विद्युत पदविका व पदवी प्रशिक्षणार्थी अभियंता यांच्या इंडक्शन लेव्हल दीर्घकालीन प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शन करत होते.

या प्रसंगी सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादीकर, तसेच नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे उपस्थित होते.
संचालक पवार पुढे म्हणाले की, “महावितरणमध्ये कार्य करताना एकाच वेळी विविध आघाड्यांवर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थींनी मल्टी-टास्किंग कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. ग्राहक सेवा देताना सकारात्मक दृष्टिकोन आणि मानवीय संवेदना ठेवून ग्राहकांशी आपुलकीचे नाते निर्माण करावे.”ते पुढे म्हणाले, “आपल्या दैनंदिन कामातून समाजात  एक कुशल अभियंतासह एक उत्तम व्यक्ती म्हणूनही प्रतिमा निर्माण करा. ग्राहकांच्या सूचना आणि तक्रारींवर त्वरीत प्रतिसाद देऊन त्यांचा निपटारा केल्यास महावितरणच्या ग्राहक सेवेचा नावलौकिक अधिक उंचावेल.”कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी अभियंत्यांनी मनोगतातून सांगितले की, प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून महावितरणच्या कार्यक्षमता आणि प्रतिष्ठेत आणखी भर घालू. यावेळी सर्वांनी विद्युत सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादीकर यांनी केले, तर सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता चरणसिंह इंगळे यांनी केले. कार्यक्रमास कार्यकारी अभियंते चेतन वाडे, आनंद देशमुख, प्राजक्ता कुलकर्णी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक परिमंडळातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक
यासोबतच संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी एकलहरे येथे नाशिक परिमंडळातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व इतर अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक घेतली.

बैठकीत परिमंडळातील विविध योजना, कामकाजाची अंमलबजावणी, तसेच ग्राहक सेवा गुणवत्ता यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.नाशिक परिमंडळातील सर्व श्रेणीतील ग्राहकांना अखंडित, सुरक्षित आणि गतिमान वीज सेवा देण्यासाठी संचालक पवार यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीस मुख्य अभियंता सुंदर लटपटे उपस्थित होते.

COMMENTS