नाशिक : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणास्रोत ठरलेल्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताचा गौरवशाली १५० वा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण महाराष
नाशिक : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणास्रोत ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा गौरवशाली १५० वा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते.
व्यासपीठावर विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. डॉ. संजीवनी महाले, प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. बी. पी. पाटील, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे, कृषी विज्ञान विद्याशाखा संचालिका डॉ. माधुरी सोनवणे, डिजीटल शिक्षण विद्याशाखा संचालक प्रा. गणेश लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निमित्ताने ‘वंदे मातरम्’ चे सामूहिकरीत्या गायन करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ गीताविषयी आणि त्या गीताचा अर्थ उलगडून दाखविणाऱ्या दोन स्वतंत्र माहितीपर लघुचित्रफिती दाखविण्यात आल्या. नाशिकमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या परंतु मूळ मेघालय राज्यातील असलेल्या बालावनक्युन्तीव मार्विन, सैनी पाले, इबालारी डकहर, बुआम श्याल्ला या चार विद्यार्थिनींनी देखील ‘वंदे मातरम्’चे समुहगीतगायन सादर केले. तसेच यावेळी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘वंदे मातरम् – १५० वर्षांचा प्रवास’ या विषयावरील नवी दिल्ली येथील संबंधित कार्यक्रमातील मार्गदर्शनाचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी ज्या भूमीत आपण जन्मलो, वाढलो त्या मातृभूमीस वंदन करणे जसे गरजेचे आहे, तसेच तिची निगा व स्वच्छता राखणे देखील गरजेचे असल्याचे प्रतिपादीत केले. या भूमीसाठी, देशासाठी आपण अधिक चांगले काय करू शकतो याचा प्रत्येकाने विचार करावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच ‘वंदे मातरम्’ गीताच्या दिडशताब्दी वर्षपुर्तीनिमित्त मुक्त विद्यापीठातर्फे आगामी वर्षभर विद्यापीठ मुख्यालय, विभागीय केंद्रे व अभ्यासकेंद्रे येथे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरिस सांगितले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विद्यापीठाच्या ग्रामीण विकास व उद्योजकता विभागाचे संचालक प्रा. कैलास मोरे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी विद्यापीठाचे विविध विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक समन्वयक, सुरक्षा कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS