Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजाभाऊ मुळे लिखित “परिसवेध” ग्रंथाचा उद्या बेलापूरला वितरण सोहळा

बेलापूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपुर्ती निमित्त महाराष्ट्र प्रांताचे वैचारिक प्रमुख रविंद्र उर्फ राजाभाऊ मुळे लिखित "परिसवेध " य

राज्यात ‘अपना भांडार’च्या माध्यमातून खरेदी विक्रीची साखळी उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल
बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्याबांधकामांवर कठोर कारवाई: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन : मंत्री अतुल सावे
Displaying IMG-20251105-WA0045.jpg

बेलापूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपुर्ती निमित्त महाराष्ट्र प्रांताचे वैचारिक प्रमुख रविंद्र उर्फ राजाभाऊ मुळे लिखित “परिसवेध ” या ग्रंथाचा वितरण सोहळा आणि स्नेहमेळावा उद्या शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बेलापूर येथे आयोजित केला आहे.

संघाच्या शतकी वाटचालीत प्रतिकूल परिस्थितीत संघकार्यासाठी योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांचा त्याग आणि योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा परिचय या ग्रंथात करुन दिला आहे.

श्री. वनदेव महानुभाव मठाचे प्रमुख श्री. आनेराजबाबा शास्त्री यांच्या आशीर्वादाने आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश अण्णाजी तथा नानासाहेब जाधव व महाराष्ट्र राज्य वैचारिक प्रमुख रविंद्र तथा राजाभाऊ मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

स्व. मातोश्री पुष्पा वसंतराव शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री. विलास वसंतराव शिंदे व परिवार आणि पुश फॉर फिलनथ्रो्पिक ऍक्टिव्हिटज यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बेलापूर बुद्रुक, वार्ड नं. १ सातभाई वस्ती येथील श्री. वनदेव महानुभाव मंदिर येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

COMMENTS