Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हळद लागण्यापूर्वीच नवरीसह नातेवाईक फरार ; राहुरी तालुक्यातील घटना

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील एका तरुणाचा राहुरी शहरातील तरुणीशी विवाह ठरला होता. वरपक्षाकडून लाखो रुपयांचा खर्च करून विवाहसोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र हळदीच्या दिवशीच नवरी आणि तिचे नातेवाईक फरार झाल्याने नवरदेवाची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवरदेवाने राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, असा आरोप पीडित तरुणाने केला आहे.  म्हैसगाव येथील तरुणाचा विवाह राहुरी येथिल तरुणी बरोबर ठरला आणि वधू कडील मंडळीनी वराकडून पैशांची मागणी सुरु केली. राहुल त्रिंबक गागरे (वय ३०, व्यवसाय शेती, रा. म्हैसगाव) हा तरुण शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. काही महिन्यांपूर्वी त्याच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. दरम्यान ताहराबाद येथील ऋषिकेश इरुळे या ओळखीच्या व्यक्तीने राहुरी शहरातील मल्हरवाडी रोड परिसरात राहणारी एक मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम केला. नवरी नवरदेव दोघांची भेट ठरवून दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांची बैठक झाली आणि दोघांची पसंतीही झाली. त्यानंतर नवरीच्या वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी काही रक्कम देण्याची मागणी केली. वरपक्षाकडून विवाह निश्चित करून पुढील तयारी सुरू झाली. नवरीच्या वडीलांनी अडीच लाखांची रक्कम आणि वीस हजार किमंतीचा मोबाईल घेतला.  पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरीच्या वडिलांनी वेळोवेळी दीड लाख रुपये रोख, तसेच लग्नाच्या तयारीसाठी आणखी खर्च म्हणून काही रक्कम घेतली. शिवाय नवरदेव राहुल गागरे यांनी नवरीसाठी २० हजार रुपयांचा स्मार्टफोन, तसेच तिच्या कुटुंबीयांसाठी नवीन कपडे व इतर साहित्य खरेदी केले. अशा प्रकारे वरपक्षाकडून एकूण सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा वधूपक्षाने करुन खर्च घेतला.   विवाह सोहळा रविवारी (दि. २६)  राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्याचे ठरले होते. नवरदेवाच्या कुटुंबियांनी मंडप, पाहुण्यांची व्यवस्था, जेवणावळीचे नियोजन आणि इतर सर्व तयारी पूर्ण केली होती.राजेश्वर मंदिर परिसरात हळदीची तयारी सुरु असतानाच,राहूरी शहरातून अचानक नवरी गायब झाली.  विवाहाच्या आदल्या दिवशी हळद लागण्यापूर्वीच नवरी मुलगी, तिचे वडील आणि नातेवाईक अचानक राहुरी शहरातून बेपत्ता झाले. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्या कुटूबंतील सर्वांचे फोन बंद आढळले.  राहुल गागरे यांनी तत्काळ राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल करुन घेण्याची विनंती केली.   या प्रकारामुळे राहुरी परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. विवाहासारख्या पवित्र सोहळ्यात फसवणूक झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाने तत्काळ चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

दहा दुचाकीसह पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या,स्थागुशाची कारवाई
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर; मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी बैठक
मुलीचा गळा आवळून बापाची आत्महत्या

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील एका तरुणाचा राहुरी शहरातील तरुणीशी विवाह ठरला होता. वरपक्षाकडून लाखो रुपयांचा खर्च करून विवाहसोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र हळदीच्या दिवशीच नवरी आणि तिचे नातेवाईक फरार झाल्याने नवरदेवाची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवरदेवाने राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, असा आरोप पीडित तरुणाने केला आहे.

 म्हैसगाव येथील तरुणाचा विवाह राहुरी येथिल तरुणी बरोबर ठरला आणि वधू कडील मंडळीनी वराकडून पैशांची मागणी सुरु केली. राहुल त्रिंबक गागरे (वय ३०, व्यवसाय शेती, रा. म्हैसगाव) हा तरुण शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. काही महिन्यांपूर्वी त्याच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. दरम्यान ताहराबाद येथील ऋषिकेश इरुळे या ओळखीच्या व्यक्तीने राहुरी शहरातील मल्हरवाडी रोड परिसरात राहणारी एक मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम केला. नवरी नवरदेव दोघांची भेट ठरवून दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांची बैठक झाली आणि दोघांची पसंतीही झाली. त्यानंतर नवरीच्या वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी काही रक्कम देण्याची मागणी केली. वरपक्षाकडून विवाह निश्चित करून पुढील तयारी सुरू झाली. नवरीच्या वडीलांनी अडीच लाखांची रक्कम आणि वीस हजार किमंतीचा मोबाईल घेतला.

 पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरीच्या वडिलांनी वेळोवेळी दीड लाख रुपये रोख, तसेच लग्नाच्या तयारीसाठी आणखी खर्च म्हणून काही रक्कम घेतली. शिवाय नवरदेव राहुल गागरे यांनी नवरीसाठी २० हजार रुपयांचा स्मार्टफोन, तसेच तिच्या कुटुंबीयांसाठी नवीन कपडे व इतर साहित्य खरेदी केले. अशा प्रकारे वरपक्षाकडून एकूण सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा वधूपक्षाने करुन खर्च घेतला.

  विवाह सोहळा रविवारी (दि. २६)  राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्याचे ठरले होते. नवरदेवाच्या कुटुंबियांनी मंडप, पाहुण्यांची व्यवस्था, जेवणावळीचे नियोजन आणि इतर सर्व तयारी पूर्ण केली होती.राजेश्वर मंदिर परिसरात हळदीची तयारी सुरु असतानाच,राहूरी शहरातून अचानक नवरी गायब झाली.

 विवाहाच्या आदल्या दिवशी हळद लागण्यापूर्वीच नवरी मुलगी, तिचे वडील आणि नातेवाईक अचानक राहुरी शहरातून बेपत्ता झाले. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्या कुटूबंतील सर्वांचे फोन बंद आढळले.

 राहुल गागरे यांनी तत्काळ राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल करुन घेण्याची विनंती केली.   या प्रकारामुळे राहुरी परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. विवाहासारख्या पवित्र सोहळ्यात फसवणूक झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाने तत्काळ चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

COMMENTS