पंढरपूर मतमोजणी आकडेवारीमध्ये तफावतीचा आरोप

Homeमहाराष्ट्र

पंढरपूर मतमोजणी आकडेवारीमध्ये तफावतीचा आरोप

मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची २ मे रोजी मतमोजणी पार पडली. निवडणुकीत झालेले मतदान व माेजलेले मतदान यात सुमारे १३०० मतांची तफावत आहे.

शक्ती कायदा लवकर लागू करण्यात यावा
दैनिक लोकमंथन ; माध्यमांच्या वृत्ताकंनावर बंदीस नकार ;विखेंची रेमडेसिव्हिर खरेदी चंदीगडमधून
कुस्तीला वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची ग्वाही

 सोलापूर : पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची २ मे रोजी मतमोजणी पार पडली. निवडणुकीत झालेले मतदान व माेजलेले मतदान यात सुमारे १३०० मतांची तफावत आहे. प्रमुख दोन उमेदवार वगळता इतर उमेदवारांना मिळालेले मतदान आणि मतदारसंघातील लोकांकडून केलेले मतदान यात मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. 

ज्या गावातून आम्हाला हजारो मते पोल झाली आहेत. अशा ठिकाणी ४ व २ मते दाखवली जात आहेत. सर्वसामान्य जनतेला व आम्हाला ईव्हीएम मशीनशी छेडछाड झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, ही मतमोजणी मान्य नाही. त्यामुळे फेरमतमोजणी घेऊन यावेळी मतदान केल्यानंतर डब्लूपीएटी मशीनमध्ये पडणाऱ्या चिठ्ठ्याही मोजण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे.

सीलबंद गोडाऊनसमोर ती वस्तू पडली कशी ?पंढरपूर येथील शासकीय गोदामांमध्ये ईव्हीएम मशीन असलेली स्ट्राँगरूम पूर्णपणे सीलबंद होती. गोडाऊन क्रमांक ४/सीच्या पुढील उजव्या बाजूच्या कट्ट्यावर यूयूपीएटीचा बॅटरी व फाटलेले पांढरे पाकीट पडलेले होते. त्या पाकिटावर ‘१५२/५८’ असा उल्लेख होता. सर्व गोडाऊन सीलबंद होते तर ही वस्तू त्या ठिकाणी पडली कशी ? कोणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केला आहे का? त्या दिवशीच्या तेथे कर्तव्य बजावत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई कशी केली नाही, असा सवालदेखील सचिन पाटील यांनी उभा केला आहे.

COMMENTS