Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरपालिका-नगरपंचायतीमधील आरक्षण जाहीर ; 17 एससी तर 34 नगरपरिषदा ओबीसी महिलांसाठी राखीव

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक

पाथर्डी तालुक्याच्या राजकारण आणि समाजकारणामध्ये बाबुजींचे खूप मोठे योगदान: आमदार राजळे
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
महापारेषणच्या यंत्रणेत बिघाड; पिंपळे सौदागर,सांगवी, रहाटणीमध्ये विजेचे चक्राकार भारनियमन
Nagarparishad-Nagarpanchayat Reservation : कोण होणार तुमचा नगराध्यक्ष?  नगरपरिषद व नगरपंचायतींमधील आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी - Marathi News |  Maharashtra Nagarparishad And ...

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जाती अर्थात एससी महिलांना तर 34 नगरपरिषदा ओबीसी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगरपरिषदांचा समावेश आहे.
नगरपालिकांची प्रभाग रचना अंतिम झाली होती. मात्र, आरक्षण जाहीर झाले नसल्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक होती. आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या (एससी) महिलांसाठी आरक्षित असलेल्या 17 नगरपालिकेंच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे 17 नगरपालिकांचा कारभार हा अनुसूचित जातींच्या महिलांच्या हातात असणार आहे. या आरक्षणामुळे राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे.

68 नगरपरिषदा महिलांसाठी खुल्या प्रवर्गात राखीव
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी 68 नगरपरिषदा राखीव केल्या गेल्या आहेत. यामध्ये विविध जिल्ह्यांतील नगरपरिषदा व नगरपंचायतींचा समावेश आहे. यादीमध्ये काही प्रमुख नगरपरिषदा अशी आहेत: परळी वैजनाथ, मुखेड, अंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवनी, कन्नड, मलकापूर-कोल्हापूर, मोवाड, पंढरपूर, खामगाव, गंगाखेड, धरणगाव, बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदूरा, सावनेर, मंगळवेढा, कलमनूरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगुड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, भूम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलुस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदीरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगाव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर आणि अलिबाग.

17 नगरपरिषदांसाठी एससी महिला प्रवर्ग आरक्षण
राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार, खालील 17 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्ग आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुग्गूस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैनदर्गी, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड आणि शिरोळ या नगरपरिषदांचा समावेश आहे.

34 नगरपरिषदा ओबीसी महिलांसाठी राखीव
64 नगरपरिषदांपैकी 34 नगरपरिषदांमधील नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या नगरपरिषदांमध्ये इगतपुरी, भोकरदन, जुन्नर, दौंड, माजलगाव, कर्जत, रोहा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, भगूर, विटा, बल्हारपूर, धाराशिव, उमरेड, कुळगाव बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजीरा, शिरूर, काटोल, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर- नवाबपूर, औसा, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, कुरडुवादी, धामणगावरेल्वे आणि वरोरा या नगरपरिषदांचाही समावेश ओबीसी महिला आरक्षित यादीत आहे. यासोबतच भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौडं, कुलगाव बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजीरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर-नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, रोहा, कुरडुवादी, धामणगावरेल्वे, वरोरा या नगरपरिषदांचा देखील समावेश आहे.

COMMENTS