Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत : दीडशे कोटी रुपयांच्या रस्त्यावर मोठे खड्डे ; खड्ड्यांमध्ये झाडे लावून राष्ट्रवादी काँग्रेसची गांधीगिरी

कर्जत : कर्जत शहर व परिसरातील रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्याच्या सुरुवातीला केवळ मुरूम टा

नारायण टेक्नो नांदेड या शाळेस शासनाची मान्यता नाही
जिल्ह्यातील 2 हजार 620 महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविणार : महसूल मंत्री बावनकुळे
Displaying 1003118409.jpg

कर्जत : कर्जत शहर व परिसरातील रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्याच्या सुरुवातीला केवळ मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा दिखावा केला होता. मात्र, मुसळधार पावसाने तो मुरूम वाहून गेला आणि पुन्हा मोठमोठे खड्डे तयार झाले. नागरिकांचा जीव धोक्यात येत असताना या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गट  कार्यकर्त्यांनी आज अनोखे आंदोलन माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या नेतृत्वाखाली छेडले. या आंदोलनामध्ये अभय बोरा, अजय भैलूमे , भूषण ढेरे, रजाक झारेकरी, नामदेव थोरात, अफताफ सय्यद,रघु आबा काळदाते , ऋषिकेश धांडे,राजेंद्र पवार, महेंद्र थोरात ,सागर सुर्वे, रमेश कचरे ,रोहन कदम ,मनोज गायकवाड, फैज सय्यद, महादेव खंदारे, शुभम चांगण ,मुन्ना ढवळे , अभिजीत महामुनी ,प्रतीक ढेरे ,चंद्रकांत पठाडे, बाबा भिसे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

कर्जत शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आहेत. यामध्ये अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आले.

त्यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले की, कर्जत शहरांमध्ये कर्जत राशीन रोड मेन रोड कुळधरण रोड या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. दीडशे कोटी रुपये खर्च करून कर्जत शहरांमध्ये जाणारा मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. या खड्ड्याचा अंदाज न आल्याने शाळकरी मुलं मुली , वृद्ध महिला पुरुष वाहन चालक यामध्ये कडून जखमी झाले आहेत. चार चाकी वाहने खड्ड्यांमध्ये आपटल्याने अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. काही प्रवासी जखमी झाल्या आहेत. विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या रस्त्याच्या कडेला ज्या गटारी बांधल्या आहेत त्यामधून पाणी जात नाही. देखभालीची जबाबदारी ठेकेदारावर आहे मात्र ते काहीच करत नाही. त्रास मात्र जनतेला सहन करावा लागत आहे. यामुळे आज गांधीगिरी करून आंदोलन केले आहे मात्र पुढच्या आंदोलन गांधीगिरी चे राहणार नाही. असा इशारा श्री राऊत यांनी यावेळी दिला.

 यावेळी नामदेव थोरात, अभय बोरा, ऋषिकेश धांडे, व रघु आबा काळदाते यांनी देखील आपल्या भाषणांमधून सारे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. 

COMMENTS