Homeताज्या बातम्याशहरं

‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे,

(HSRP) उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
विनायक नगर हाउसिंग सोसायटीसाठी पाणीपुरवठा जोडणीची मागणी
हिवरे बाजार येथील डोंगरात वणवा

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे, असे आवाहन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी येत्या दोन महिन्यांत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन केवायसी करणे बंधनकारक असून, यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून लाडक्या बहिणींना योजनेंतर्गत लाभ वेळेत व अचूक मिळण्यास मदत होणार आहे. या केवायसीमुळे महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या इतर योजनांचा लाभही प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पारदर्शकपणे मिळणार असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

COMMENTS