Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरच्या जाखुरीमध्ये महिलेची हत्या, संशयित आरोपी पतीला ताब्यात 

संगमनेर : अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेरच्या आश्वी बुद्रुक येथे समोर आल्याचे वृत्त समोर य

‘मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
परीक्षा ‘नीट’; मात्र वाहतूक वेडीवाकडी..!
राज्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी बृहत आराखडा तयार करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

संगमनेर : अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेरच्या आश्वी बुद्रुक येथे समोर आल्याचे वृत्त समोर येऊन काही तास उलटत नाही तोच तालुक्यातील चाकूर येथे महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे.

संगीता भारत मोरे (वय ४०, रा. नादनठाण, ता. वैजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती भारत मोरे याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. संगीता मोरे, त्यांचे पती भारत मोरे आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती जाखुरी येथील जावई सोमनाथ सुरशे यांच्या घरी मुक्कामी आले होते. रविवारी रात्री सर्व कुटुंबियांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर संगीता मोरे झोपी गेल्या. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या वनविभागाच्या जंगलात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह पोलिसांनी, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या गळ्यावर खुणा असल्याने हा खून झाल्याचा तसेच पती-पत्नीत वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले. ‘सीमा’ नावाच्या श्वानाने आरोपीच्या चपलांचा वास घेत घरापासून ते मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंतचा माग काढला. पोलिसांनी तात्काळ पती भारत मोरे याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत आलेल्या अनोळखी व्यक्तीचा या गुन्ह्यात सहभाग आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS