Homeताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी अनुभवला सितारे जमीन पर चित्रपट

     नगर -    इनरव्हिल क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीने टिळक रोडवरील मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नुकताच प्रदर्शित झालेला सितारे जमी

मणिपूरमधील हिंसाचारात पुन्हा तिघांचा मृत्यू
कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची सुटका
चांदवड ला पुन्हा रास्ता रोको , शेतकरी रस्त्यावर  

     नगर –    इनरव्हिल क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीने टिळक रोडवरील मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नुकताच प्रदर्शित झालेला सितारे जमीं पर हा चित्रपट दाखवण्यात आला. आकाशातले तारे जणू पृथ्वीवर अवतरलेत, असे भाव या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर चित्रपट पाहून आले होते. सामान्य मुलांपेक्षा वेगळं आयुष्य जगणार्या या मुलांच्या चेहर्‍यावर आज चित्रपट पाहून हसू आलं होतं. बाबा वाडीतील मुलांनाही हा चित्रपट दाखवण्यात आला

     इनरव्हिल क्लब हि जागतिक महिला संघटना असून विविध सामाजिक उपक्रम यांच्याद्वारे नेहमी राबवले जातात. असाच एक आगळा वेगळा उपक्रम बाबा वाडीतील आणि टिळक रोडवरील मतिमंद शाळेच्या सहकार्याने इनरव्हिल क्लब ने आयोजित केला होता. नुकताच प्रदर्शित झालेला सितारे जमीं पर हा चित्रपट या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.

     यावेळी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा मधुबाला चोरडिया यांनी  सांगितले की, हा चित्रपट विशेष मुलांसाठी असल्याने आम्ही हा उपक्रम राबवला. या मुलांचे आयुष्य हे नेहमीचं समस्यांनी ग्रस्त असते. हा चित्रपट याचं मुलांची कहाणी दाखवतो. त्या मुलांच्या आणि पालकांच्या जिद्दीला खरोखर सलाम आहे. त्याचबरोबर या उपक्रमासाठी क्लबच्या जवळपास 35 हून अधिक महिला सदस्य उपस्थित होत्या. बाबावाडी आणि मतिमंद शाळेतील जवळपास 50 हून अधिक मुलांनी या चित्रपटाचा आनंद लुटला. यासाठी सिनेलाइफ चे मनोज सर, मॅनेजर जालिंदर सर, व पूर्ण स्टाफने खूप सहकार्य केल्याचे ही त्यांनी सांगितले.

     गुरुपौर्णिमा हि जवळ येत असून, मतिमंद शाळेतील शिक्षक खर्या अर्थाने या मुलांसाठी गुरु बनून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांचं करावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांच्या हातून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

     इनरव्हिल क्लब चे उद्दिष्ट हे परस्परांतील मैत्री वाढवणे, वैयक्तिक सेवेला प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढवणे असल्याचे सांगत मधुबाला चोरडिया यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी सेक्रेटरी सुजाता कटारिया, क्लब पीडीसी सायली खानदेशी, डॉ बागल, डॉ दमयंती गुंजाळ, दिपा चंदे, सुनीता कर्णावट, पुष्पा कोरे, लक्ष्मी काळे, नंदा यादव, शर्मिला बाफना, मंगल दुगड, मनिषा कर्नावट, प्रभा कर्नावट, गीतांजली काळे, हेमा निसळ, शैलजा गांधी, लता शेळके, वैशाली रायते, सुरेखा चोरडिया, कांता चंगेडिया, रुपाली शिंगवी, वंदना भंडारी, उज्वला भंडारी, दिपा पितळे, हेमा लुणिया, इनरव्हिल क्लबच्या पदाधिकारी तसेच मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बनकर, मानसशास्त्रज्ञ श्रीमती माधवी कुटे, वाचा उपचार तज्ज्ञ श्री विक्रम उंडे, कार्यशाळा निर्देशिका श्रीमती जाधव मॅडम, बाबा वाडीतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

COMMENTS