विधानपरिषद निवडणूक : भाजपचे आयात उमेदवार!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

विधानपरिषद निवडणूक : भाजपचे आयात उमेदवार!

विदर्भात दोन, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि खान्देश यातील प्रत्येकी एक अशा एकूण पाच विधानपरिषद जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या

सरकारला निर्णयाचे स्वातंत्र्य असावेच!
महासभा : संविधान सन्मान ची की वंचित आघाडीची ! 
जागतिक आरोग्य संघटना आणि मानवी हीत!

विदर्भात दोन, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि खान्देश यातील प्रत्येकी एक अशा एकूण पाच विधानपरिषद जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा करून एक प्रकारे निवडणुक प्रक्रियेत आघाडी घेतली. उमेदवारांची घोषणा करून भाजपचे राजकारण अजूनही आयात नेत्यांच्या आधारावर सुरू आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यांनी घोषित केलेल्या एकूण पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे मुळचे काॅंग्रेसचे आहेत. काॅंग्रेसमधून भाजपात दाखल झालेले उमेदवार हे काही वर्षांपूर्वीच त्या पक्षात आले असले तरी त्यांनी काॅंग्रेस का आणि केव्हा सोडली हा प्रश्न मात्र कधीच चर्चेत येत नाही! यातील धुळे-नंदूरबार विधान परिषदेचे उमेदवार अमरिशभाई पटेल हे तर इंदिरा माय या भावना असणाऱ्या आदिवासी भागातून त्यांचे उत्थान झाले. मुळचे गुजरात चे असणाऱ्या पटेल यांचे कुटुंब शिरपूर येथे स्थायिक झाले. अमरिशभाई पटेल यांचे वडील मुंबई-आग्रा हायवेवर प्रसिद्ध असणाऱ्या शिरपूर फाट्यावर एका डब्यात केरोसीन विकत. परंतु, त्यानंतर आदिवासी भागातील राजकीय नेत्यांची मर्जी संपादन करित त्यांनी शिवाजीराव पाटील यांच्या सोबत आपले बस्तान बसवत व्यंकटराव रणधीर या ओबीसी शिक्षण महर्षी असणाऱ्या व्यक्तिमत्वाला शह देत काॅंग्रेस मध्ये स्थिरावले. त्यानंतर नगराध्यक्ष, आमदार,मंत्री, जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद असं सर्वकाही आले. खासदारकीची उमेदवारी दिली गेली. परंतु, सत्ता ही या लोकांना एवढी प्रिय होतें की, आपला पक्ष जर सत्तेतून बाहेर गेला तर यांना अस्वस्थ होते. कमी अधिक फरकाने कोल्हापूर आणि मुंबई विधानपरिषद मतदार संघाचे भाजप उमेदवारांची यापेक्षा वेगळे गत नाही. काॅंग्रेसमधून भाजपात जाणे या राजकीय नेत्यांना इतके सहज का वाटते? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर कोणत्याही वैचारिकतेशी यांची बांधिलकी नसते. कोणत्याही पक्षात ते गेले तरी त्यांची उमेदवारी त्यांना सुरक्षित हवी असते. म्हणजे आपला राजकीय उदय हा आपल्या पिढीजात परंपरेनुसार पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहचविण्याची हमी ज्या पक्षात राहील तिथे यांचा सहज शिरकाव होतो. कोणत्याही पक्षात त्यांचे पक्षश्रेष्ठी जातवर्गीय पातळीवर एकच असल्याने त्यांना फारसा काही फरक पडत नाही! परंतु, ज्या लोकांचे आणि मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करतात तेथील लोकांच्या विकासाशी त्यांना काहीच घेणे-देणे नसते. लोकांचा वैचारिक विकास तर या नेत्यांनी कधीच होऊ दिलेला नाही. भाजपच्या राजकीय विचारांशी मतभेद असले तरी ते त्यांच्या विचारांचे जे उद्दीष्ट असेल त्यादिशेने ते वाटचाल करताहेत. त्यांचे अंतिम उद्दिष्ट जे ठरलेले आहे, त्याठिकाणी आज भाजपने जे उमेदवार दिले त्यांचे आणि त्यांच्या समाजघटकांना काही स्थान नाही! अर्थात, काॅंग्रेसच्याही उद्दिष्टांच्या अंतिम पडावात यांना स्थान असेल का, असा प्रश्न विचारला तर उत्तर नकारार्थी मिळेल. समाजाचा जो बहुसंख्यांक हिस्सा आहे, त्याला वाऱ्यावर सोडणारे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि व्यवस्था काॅंग्रेसने देखील स्वातंत्र्योत्तर काळात पोसली आहे. सभ्य समाज रचनेत धरसोड प्रवृत्ती निषेधार्ह असते. परंतु, अशा प्रवृत्ती जेव्हा सर्रास होतात तेंव्हा ती समाजरचना आणखी खालावली आहे, असे समजावे. आज जर ग्रामीण भागात आपण पाहिले तर राजकीय पुढाऱ्यांची भ्रष्ट नक्कल करण्याची चढाओढ तरूणांमध्ये लागलेली असते. या चढाओढीची प्रेरणा एकच असते अन् ती म्हणजे सत्ता आणि संपत्ती! भाजपने विधानपरिषद निवडणुकीत उतरवलेले तीन उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या भक्कम असणारे आहेत. त्यांच्याकडून प्रचारात शक्य तितका मलिदा काढून घेतला जाईल. अर्थात या लढ्यात उमेदवारी देताना संभाव्य उमेदवार हा आपल्या उमेदवाराचा वैयक्तिक मित्र असावा हा विशेष पाहिला गेला आहे. धुळे-नंदूरबारचे उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास अमरिशभाई पटेल आणि चंद्रकांत रघुवंशी हे दोन्ही मुळचे परप्रांतीय परंतु आदिवासी भागात दोन्ही काॅंग्रेसी होते आणि तितकेच ते घनिष्ठ मित्र. परंतु, आज रघुवंशी सेनेत आहेत. अशा ठिकाणी जर महाविकास आघाडीने मैत्रीसंदर्भातला उमेदवार दिला तर फायदा भाजपला पोहोचतो. त्यामुळे पैसा या निवडणुकीत मोठा घटक ठरेल. हे सर्व टाळायचे असेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची बूज राखायची असेल तर महाविकास आघाडीने नव्या दमाचे तरूण पुढे आणायला हवे!

COMMENTS