आमदाराने मारहाण करणे चुकीचे, अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा – CM फडणवीस

Homeताज्या बातम्या

आमदाराने मारहाण करणे चुकीचे, अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा – CM फडणवीस

मुंबई /शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणाचे विधान मंडळात पडसाद उमटले. अनिल परब यांनी त्यांच्

इंदोरी फाटा बनले अवैध दारू विक्रीचे केंद्र
Kopardi Rape And Murder Case : कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणाची सुनावणी तहकूब
राजकारणातील चघळेगिरी

मुंबई /
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणाचे विधान मंडळात पडसाद उमटले. अनिल परब यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली.

आमदार निवासातील कँटिनमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गोंधळ घातला. जेवण खराब असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट कँटिनमधील कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली. आमदार गायकवाड यांच्या या कारनाम्याचा मुद्दा विधान परिषदेत शिवसेनेचे (यूबीटी) आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यांनी संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याचीच मागणी केली. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत कानउघाडणी केली. त्यांनी अध्यक्षांना या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करायची ती करावी, अशी भूमिका मांडली.

संजय गायकवाड यांच्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडीओ मी स्वतः बघितला आहे. अशा प्रकारचे वर्तन आपल्या कुणासाठीही भूषणावह नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आपल्या सगळ्यांची आणि आमदारांची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होते.”

“माहिती अशी आली की आमदार निवासातील व्यवस्था नीट नव्हती. भाजी वास मारत होती. या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते. त्याच्यावर कारवाई करता येते. तो वेगळा मुद्दा आहे. अध्यक्ष महोद, आमदार निवासामध्ये काहीही अनियमितता असेल, तर आपण स्वतः लक्ष घालावं”, असे देवेद्र फडणवीस म्हणाले.

आमदारांबद्दल लोकांच्या मनात चुकीची भावना जाते -फडणवीस
“अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधीने मारहाण करणे आणि त्याचे व्हिडीओ येणे. टॉवेलवर येऊन मारलं किंवा कसेही मारले तरी ते चुकीचेच आहे, योग्य नाहीये. यातून सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना जाते”, असे म्हणत फडणवीसांनी खंत व्यक्त केली.

COMMENTS