शेतकर्‍यांकडून थेट कांदा खरेदी करा

Homeताज्या बातम्याकृषी

शेतकर्‍यांकडून थेट कांदा खरेदी करा

कृषीमंत्री कोकाटे यांची केंद्र सरकारकडे मागणी

नवी दिल्ली ः महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकर्‍यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज

महाबळेश्‍वर गिरीस्थान नगरपरिषदेच्यावतीने हेरिटेज सप्ताहाचे आयोजन
मांडूळ तस्करीचा पर्दाफाश; तिघांकडून जिवंत मांडूळ हस्तगत
आ.डॉ.राहुल आहेर यांनी केली दरेगाव येथे पिकांची पाहणी

नवी दिल्ली ः महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकर्‍यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी  केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत केली. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.


देशातील एकूण कांदा उत्पादनात 55% वाटा उचलणार्‍या महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मे 2025 मधील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसला आहे. कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर, राज्याचे कृषीमंत्री श्री कोकाटे आणि पणन मंत्री रावल यांनी आज केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली.

यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी थेट शेतकर्‍यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा, मध्यस्थांची भूमिका कमी करावी. 2025-26 मध्ये 6 लाख मेट्रिक टन कांदा थेट शेतकर्‍यांकडून खरेदी करून डिबिटी (डीबीटी) प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावेत.

ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकरित्या व्हावी यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक पथकाची नेमणूक करावी. यासह किरकोळ बाजारात कांद्याचा दर 40-45 रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल. या प्रमुख मागाण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यास ग्राहकांनाही वाजवी दरात कांदा उपलब्ध होईल, असा विश्‍वास दोन्ही मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत कृषी लॉजिस्टिक्स हब उभारण्यात आला असून, याचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री यांच्या हस्ते व्हावे यासाठी आज पणन मंत्री श्री रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्री चव्हाण यांना निमंत्रण दिले.

COMMENTS