अहिल्यानगर /दुधसागर सोसायटी केडगाव परिसरात प्लॉटची खरेदी देण्यासाठी दोघांनी इसारापोटी 17 लाख 80 हजार रुपये घेऊन आजपर्यंत प्लॉटची खरेदी दिली नाही.
अहिल्यानगर /
दुधसागर सोसायटी केडगाव परिसरात प्लॉटची खरेदी देण्यासाठी दोघांनी इसारापोटी 17 लाख 80 हजार रुपये घेऊन आजपर्यंत प्लॉटची खरेदी दिली नाही. तसेच घेतलेली रक्कम परत न देता फसवणुक केली असल्याची घटना डिसेंबर 2023 ते 16 मार्च 2024 दरम्यान भुषणनगर, केडगाव येथे घडली.
याबाबत सुरेश लगड (वय 43, रा. सुशांतनगर, केडगाव,) यांचा आदेश कंन्ट्रक्शन नावाने कंन्ट्रक्शनचा व्यवसाय असून ते प्लॉट खरेदी करुन त्यावर घर बांधून विक्री करतात. डिसेंबर 2023 मध्ये फिर्यादी हे केडगाव परिसरात घर बांधण्यासाठी प्लॉट पहात असताना त्यांच्या ओळखीचे तुकाराम कोतकर व गणेश लोंढे (दोघे रा. लोंढे मळा, केडगाव) यांनी सांगीतले की, दुधसागर सोसायटी केडगाव परिसरात सर्व्हे नंबर 208/1/209 मधील प्लॉट नं 91 क्षेत्र 3 गुंठे 96 स्केअर फुट मालक साधना औटी यांचा बिगरशेती प्लॉट आमचे दोघांकडे विक्रीस आहे. त्यांनी फिर्यादीस नोटरी साठेखत दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या प्लॉटची किंमत प्रति गुंठा 8 लाख रुपये ठरली.
त्याप्रमाणे पूर्ण प्लॉटची किंमत 24 लाख 768 रुपये ठरली. तसेच कोतकर यांनी याच परिसरातील सर्व्हे नंबर 292 मधील प्लॉट नं 221 व 222 क्षेत्र 4 गुंठे 260 स्केअर फुटचे मालक प्रेम चिन्ना काझी रेड्डी यांचा बिगरशेती प्लॉट विक्रीस आहे, असे सांगुन फिर्यादी यांना नोटरी साठेखत दाखविले. त्यानंतर त्या प्लॉटची किंमत प्रतिगुंठा 7 लाख रुपये ठरली. त्याप्रमाणे पूर्ण प्लॉटची किंमत 29 लाख 82 हजार रुपये ठरली. त्यानंतर फिर्यादी यांनी प्लॉटचे इसारापोटी गणेश लोंढे यांना 2 मार्च 2024 ते 3 जून 2024 दरम्यान वेळोवेळी शहर सहकारी बँक शाखा भुषणनगर केडगाव येथून आरटीजीएसद्वारे 8 लाख रुपये, फोन पेद्वारे 2 लाख 56 हजार रुपये व रोख स्वरुपात 2 लाख 44 हजार रुपये असे 13 लाख रुपये दिले.
तसेच सव्हें नं 292 मधील प्लॉटचे इसारापोटी तुकाराम कोतकर यांना एचडीएफसी बँक शाखा केडगाव या बँकेतुन 2024 रोजी आरटीजीएसद्वारे 4 लाख 40 हजार रुपये व फोन पेद्वारे गणेश लोंढे यास 40 हजार रुपये असे 4 लाख 80 हजार रुपये दिले आहे. परंतु तुकाराम कोतकर व गणेश लोंढे यांनी फिर्यादी यांना प्लॉटची खरेदी दिली नाही. फिर्यादी यांनी दोन्ही प्लॉटचे इसारा पोटी दोघांना दिलेले 17 लाख 80 हजार रुपये फिर्यादी यांना परत न देता विश्वासघात केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात लगड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम कोतकर व गणेश लोंढे यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

COMMENTS