पोलिसांनीच अवैध दारु विक्री बंद ठेवण्यास सांगून छापा मारायला आले, पोलिस जाताच अवैध दारु विक्री जोमात

Homeताज्या बातम्याअहमदनगर

पोलिसांनीच अवैध दारु विक्री बंद ठेवण्यास सांगून छापा मारायला आले, पोलिस जाताच अवैध दारु विक्री जोमात

दारु विक्रीच्या विरोधात महिला घेणार हातात दंडूके

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असलेल्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राजरोसपणे अवैध दारु विक्री सुरु

आदिवासी महिलेवर पोलिसांनीच केला बलात्कार
स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शिधापत्रिकाधारकांना मोफत साड्या वाटप
मनपाकडून कधी व्हायचे 213 कोटी वसुल…?थकबाकी दुर्लक्षित, पण नव्याने घरपट्टी वाढीवर मात्र प्रशासनाचा जोर

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

      पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असलेल्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राजरोसपणे अवैध दारु विक्री सुरु असलेल्या प्रसादनगर भागात गुरवारी सायंकाळी राहुरी पोलिस ठाण्यातील बीट अंमलदार शेळके व झीरो पोलिस बबन सरकारी वाहन चालक छापा टाकण्यासाठी अवैध दारु विक्रीच्या गुत्यावर पोहचले.

परंतू त्यापूर्वी बीट अंमलदार व झीरो पोलिसाने अवैध दारु विक्रेत्यांना दारु धंदे बंद ठेवण्याचे सांगून तक्रार करणाऱ्या महिलांना येथे दारु धंदेच चालू नाही. तर तुम्ही केलेली तक्रार खोटी असल्याचे दाखवून देत तक्रारदार महिलांना तोंडघशी पाडून तक्रारीत तथ्थ नसल्याचे सांगून निकाली काढण्यात आली. दारु गुत्यावरुन पोलिस काही अंतरावर जाताच अवैध दारु विक्री जोमात सुरु झाल्याने संतप्त महिलांनी पोलिसांन विरोधात तीव्र संताप व्यक्त करीत.

अवैध धंदे चालकां विरोधात संतप्त महिला हातात दंडूके घेवून अवैध धंदे चालकास दंडूकेचा प्रसाद देण्यात येणार आहे.दंडूक्याचा प्रसाद दिल्यावर फिर्याद दाखल करुन घेणाऱ्या पोलिसालाही दंडूक्याचा प्रसाद देण्याचा निर्णय संतप्त महिलांनी घेतला आहे.

         याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुरी फँक्टरी येथिल भागातील प्रसादनगर भागातील  कमी वयातील तरुण मुले दारुच्या आहरी जाऊन व्यसनाधिन झाले आहेत.याच दारुमुळे कमी वयातील अनेक तरुण मुले मयत झाले.यापूढील काळात दारुमुळे कोणी मृत्यूमूखी पडला तर त्याची सर्व जबाबदारी राहुरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर राहिल.

व त्याचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांच्या दालना समोर केला जाईल.असा संतप्त इशारा राहुरी फँक्टरी येथिल प्रसादनगर भागातील संतप्त महिलांनी देताच राहुरी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी राहुरी फँक्टरी येथिल अवैध दारु गुत्यावर छापा मारण्यासाठी पोहचतात.

परंतू त्यापूर्वी पोलिस व झीरो पोलिसाने अवैध दारुगुत्ते बंद ठेवण्यास सांंगून निवेदन देणाऱ्या महिलांना तोंडघशी पाडण्यात आले.महिलांच्या तक्रारीवरुन छापा मारला परंतू येथे दारु विक्रीच होत नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे.

छापा मारणारे दोन पोलिस व झीरो पोलिस काही अंतरावर जाताच अवैध दारु विक्री जोमात सुरु झाली.संतप्त महिलांनी अवैध दारु विक्रेत्याना तुम्ही दारु विक्री बंद करा आमचा अंत पाहू नका असे सुनावले असता आम्ही दरमहा हप्ते देतो. आमचे पोलिस काहीच वाकडे करु शकत नाही. असे दारु विक्रेत्याने महिलांना सांगितले. संतप्त महिलांनी पोलिसांना दारु विक्री बंद करता येत नाही. त्यामुळे आम्ही महिला हातात दंडूके घेवून दारु विक्री करणाऱ्यांला चोपून काढणार त्यावेळस मात्र पोलिसांनी दारु विक्रेत्यांची फिर्याद दाखल करुन घेतली तर पोलिसांनाही दंडूक्याचा प्रसाद खावा लागेल. असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.

             यावेळी शरद साळवे, लैला शेख, परवीन शेख, रेखा जाधव, सुनिता पवार, रुथ कांबळे, मंगल थोरात, सविता बनसोडे, रोशन शेख, स्वार्थाबाई जाधव, जैतून भाभी, माया साठे, लता जगताप, अलका पठारे, लता साळवे, येलनबाई गायकवाड, परिगा सरोदे, अंजू बोर्डे, पल्लवी पवार, रंगूबाई मोकळ, लक्ष्मीबाई पंडित, कविता साळवे आदि महिला उपस्थित होत्या.

COMMENTS