या आमदारांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्याची मागणी केली

Homeशहरंअहमदनगर

या आमदारांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्याची मागणी केली

अहिल्यानगर / श्रीगोंदाविधानसभागृहात प्रश्न उपस्थित करुन अवघ्या महाराष्ट्राच्या चर्चेत असलेले श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते

भाजप सरकारला चलेजाव म्हणण्याची वेळ ; थोरात यांची टीका
रयतचा गुणात्मक विकास वाखाणण्याजोगा : आमदार रोहित पवार
अमृतवाहिनीमध्ये नॅशनल कंपन्यांचे टेक्निकल फेस्ट उत्साहात


अहिल्यानगर / श्रीगोंदा
विधानसभागृहात प्रश्न उपस्थित करुन अवघ्या महाराष्ट्राच्या चर्चेत असलेले श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदीचा प्रश्न उपस्थित करुन सभागृहचे लक्ष वेधले.

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून क्षयरोग व इतर संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी आणण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना किंवा कायदे करणार असल्याचा प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे व मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.

कोरोना, स्वाईन फ्ल्यू, क्षयरोग असणारी व्यक्ती पानमसाले,गुटखा, तंबाखू जन्म पदार्थ खावुन थुंकणारी व्यक्ती असेल तर त्यापासून संसर्ग वाढुन तो फैलावु शकतो म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घातल्यास संसर्ग रोखु शकतो म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालणारे कायदे करुन अमलात आणणे गरजेचे असल्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले.


यावेळी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, स्वच्छ मोहिमेंतर्गत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून तुमच्या सूचना अमलात आणण्यासाठी विचार करणार असल्याचे स्पष्ट केले.

COMMENTS