Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीच्या घटकपक्षांना न्याय देणे हि माझी नैतिक जबाबदारी : आमदार काशिनाथ दाते

सुपा;  गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटकपक्षांनी मला निवडून आणण्यासाठी सामुहिक प्रयत्न केल्याची मला जाणीव असून त्या सर्वांना सामावू

सत्यशोधक परंपरा हाच भावी क्रांतीचा आधार असेल : सचिन झगडे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार : मुख्यमंत्री फडणवीस
आगडगाव : भैरवनाथ देवस्थानजवळ रविवारी दीड हजार किलो आंब्यांचा रस
Displaying IMG-20250630-WA0228.jpg

सुपा;  गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटकपक्षांनी मला निवडून आणण्यासाठी सामुहिक प्रयत्न केल्याची मला जाणीव असून त्या सर्वांना सामावून घेत सर्वांच्या राजकीय इच्छा आकांक्षांना समान न्याय देणे हि महायुतीचा जबाबदार घटक म्हणुन माझी नैतिक जबाबदारी असल्याचे मत पारनेर-नगरचे आमदार काशिनाथ दाते यांनी तालुक्यातील कासारे येथिल वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत कासारे ते वाघदरा रस्ता काम रु. १० लक्ष  भुमिपूजन व गोवर्धन तथा धनंजय निमसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मांडले.

कासारे ते वाघदरा रस्ता कामाचे भुमिपूजन झाल्यानंतर बिरोबा देवस्थानच्या सभामंडपात धनंजय निमसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार दाते म्हणाले कि, निच्छितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढवेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होणे बाकी आहे. महायुतीच्या घटकपक्षांच्या वाटाघाटी नेमक्या कशा होतील हे खात्रिशीररित्या सांगता येत नाही. शिवाय इच्छुकांची संख्याही भरपूर आहे, त्यामुळे आजच एखाद्या कार्यकर्त्याच्या उमेदवारीबद्दल बोलण संयुक्तिक नाही. समविचारी कार्यकर्त्यांनी कुठल्याही अटी-शर्तीशिवाय महायुतीच्या घटकपक्षांत प्रथमतः प्रवेश करावा. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत भुषविलेल्या विविध राजकीय पदांच्या माध्यमातून कासारे गावासाठी सातत्याने निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला असून आज भूमिपूजन केलेल्या १० लक्ष रुपयांच्या कासारे ते वाघदरा रस्ता कामासाठी पुढील काळात अधिकच निधी देवून काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजपचे मंडलाध्यक्ष राहुल शिंदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब खिलारी, दुध संघाचे चेअरमन दत्ता नाना पवार, सरपंच पंकज कारखिले, शिवसेना उपतालुकाध्यक्ष पंढरीनाथ उंडे, धनंजय निमसे, बबनराव झावरे, देवराम मगर, जयश्री घोलप, सरपंच सुनिता मुळे, सरपंच शिवाजी निमसे, अक्षय गोरडे, शुभम टेकुडे, अमोल रोकडे, विकास रोकडे, धोंडिभाऊ दातीर, गोपिनाथ घुले यांसह कासारे परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS