भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनायला आली आहे. अर्थात, या संदर्भातील अंदाज नीती आयोगाने यापूर्वीच व्यक्त केलेला आहे. प

भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनायला आली आहे. अर्थात, या संदर्भातील अंदाज नीती आयोगाने यापूर्वीच व्यक्त केलेला आहे. परंतु, प्रत्यक्ष स्थिती येण्यासाठी अजून काही प्रतीक्षा भारतीय अर्थव्यवस्थेला करावी लागेल. नीती आयोगाने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था जगाच्या पाच अर्थव्यवस्थांपैकी जी एक आहे; ती लवकरच चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज नीती आयोगाने यापूर्वीच व्यक्त केलेला आहे. त्यामुळे, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने घोडदौड करत आहे. हे सध्याच्या सरकारने सिद्ध केलेले आहे. तरीही, भारतातील ब्रेस ड्रेन ची समस्या ही सर्वाधिक होती; मात्र, त्यावर काही प्रमाणात तोडगा काढण्यात आला होता. परंतु, सध्या जागतिकरणानंतर भारत आर्थिक दृष्टीने वेगाने वाटचाल करीत असतानाही, देशातील अनेक तज्ञ विदेशात जाऊन अर्थार्जन करत आहेत. आपली सेवा ते अन्य देशांना देत आहेत. त्यामुळे, या समस्येला या सरकारने क्रोमी सोशालिजम चा प्रकार असल्याचं नाव दिले आहे. परंतु, भारतामध्ये सध्याच्या परिस्थितीत कोणी कॅपिटलइजम चा जो प्रचार केला जातो आहे, त्या विरोधात आता या व्यवस्थेने नवीन संकल्पना म्हणजे क्रोमी सोशालिजम प्रकार असा शोधून काढला आहे. या परिस्थितीवर आता जगभरात चर्चा होईल. परंतु, भारतीय तज्ञ जगभरात विखुरले आहेत. आपलं शिक्षण घेऊन जे जगामध्ये वेगळ्या देशांमध्ये जाण्यासाठी सगळ्यात खास करून अमेरिकेसारख्या देशांमध्ये. परंतु, अमेरिकेचा आता विजा पॉवरफुल झाल्यामुळे, भारतीय लोकांना अमेरिकेत जाणे आता कठीण होत आले आहे. अशावेळी भारतीय अर्थव्यवस्थेत आपले योगदान देऊन भारतीयांनी आपल्या गुणवत्तेची सेवा देशाला द्यावी, ही मागणी आता वेगाने पुढे येत आहे. अर्थात, ही मागणी वेगळी असली तरी तो देशाच्या धोरणांचा भाग आहे. आता नव्याने जे धोरण तयार होतील, त्यामध्ये भारतीय तरुणांना देशांतर्गत आपल्या तज्ञ म्हणून सेवा देण्याचा मोठी संधी निर्माण होईल. त्यातूनच, देशाच्या आर्थिक प्रगतीची ही घोडदौड सुरू राहील. ही सर्व बाब लक्षात घेता, देशाचा ब्रेन ड्रेन जो समजला जातो आहे, ही समस्या तातडीने सोडवणं आता गरजेचं झालेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आता समाविष्ट झाली आहे. त्यामुळे, या अर्थव्यवस्थेमध्ये सामील होण्यासाठी जगातले अनेक तरुण जे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ आहेत, ते आपली सेवा देण्यासाठी भारतातल्या अनेक शहरांमध्ये आता विखुरलेले आहेत. अशावेळी, भारतीय तरुणांनी देखील आपली सेवा तज्ञ म्हणून देण्यासाठी भारतात यावं. जगातील अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आता बदल होतो आहे. जग हे एका ठिकाणी उत्पादन करून जगभर त्याचं वितरण करण्याच्या नव्या व्यवसायाच्या अनुषंगाने, त्याचबरोबर एआय सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगावर आपलं राज्य करू इच्छिते. त्यात भारताचाही आता समावेश होतो आहे. तंत्रज्ञानात बलाढ्य असलेल्या देशांमध्ये ही भारताचा आता समावेश होतो. त्यामुळे, या नव्या संधी केवळ उत्पादन आणि व्यवसायाच्या नसून, या सेवांमध्ये असलेल्या एआय सारख्या तंत्रज्ञान आणि डेटा विज्ञान सारख्या तंत्रज्ञानामध्ये अधिक मजबूत भारताला त्या करीत आहेत. या क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या तरुणांनाही अधिक चांगलं भवितव्य आहे.

COMMENTS