Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरोळ मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी प

उजनी धरणातून कालव्याद्वारे एक आवर्तन सिंचनासाठी देण्यात यावे
देशाचा पिंड सर्वधर्मसमभावाचा आहे ते संपवू शकणार नाही-प्रणिती शिंदे 
श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत् विकास आराखडा तयार करा : सभापती प्रा.राम शिंदे

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाविषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक प्रतिनिधी सुषमा सातपुते, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये काही कंत्राटदारांकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेता, अशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच सध्या प्रगतीपथावरील कामांना अधिक गती देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या सर्व  योजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS