अभियंत्याने मुंडन करून ऊर्जामंत्र्यांचा निषेध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभियंत्याने मुंडन करून ऊर्जामंत्र्यांचा निषेध

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिलेल्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.

ज्‍येष्ठ नागरिक सारथी सन्‍मान सोहळा २०२३ चे १२ ऑगस्‍टला आयोजन 
पोलिस भरतीचा पेपर फुटल्याची अफवा पसरविणार्‍यावर गुन्हा
महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरताच

मुंबई/प्रतिनिधीः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिलेल्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर सरळसेवा भरतीद्वारे परीक्षा देऊन, मुलाखत देऊन निवड झालेल्या उमेदवारांची अद्याप नियुक्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना संताप व्यक्त केला आहे. अभियंता सचिन चव्हाण यांनी आपले मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. 

राज्य सरकारने महावितरणमधील उपकेद्र सहायक पदासाठी परीक्षा घेतली होती. ऑगस्ट 2019 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा 28 जून 2020 रोजी निकालही लागला; मात्र अद्याप नियुक्ती न मिळाल्याने सचिन चव्हाण यांनी मुंडन करून ऊर्जामंत्र्यांच्या नावाने निषेध केला आहे. महावितरणने घेतलेल्या परीक्षांमध्ये 289 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 70 ते 80 मुले वेटींगवर असल्याचे त्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील सचिन चव्हाण यांनी इलेक्ट्रीकल्स विषयात आयटीआय पूर्ण केले. त्यानंतर इंजिनिअरिंगची पदवीही घेतली; मात्र सरकारी नोकरी असल्याने महावितरणमधील जाहिरात पाहून आयटीआय पात्रतेवरून असलेल्या उपकेंद्र सहायक पदासाठी अर्ज भरला. परीक्षा दिली. निकाल लागला. निकालाच्या यादीतून निवडही झाली. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकियेमुळे या सचिनची नियुक्ती थांबली. त्यामुळे, थांबा आणि वाट पाहा… अशीच अवस्था सचिनची झाली. निवड यादीत नंबर लागल्याने सचिनला पडताळणीसाठी बोलविण्यात आले होते; पण कोरोनाचे कारण देऊन ती पडताळणी प्रक्रिया दोनदा रद्द करण्यात आली. त्यानंतर, 15 सप्टेंबर रोजी पुन्हा व्हेरिफिकेशन करून घेणार असल्याचे सांगण्यात आले; मात्र 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थिगिती मिळाल्याने पुन्हा आमच्या नियुक्तीचे घोंगडे भिजत पडले. मुंबईतील आझाद मैदानात 35 दिवस आंदोलन केले. त्या वेळी परिपत्रक घेऊन गेले, की ते सर्वोच्च न्यायालयाचे कारण सांगायचे. आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे; मात्र राज्य सरकार पर्यायी मार्ग काढून ज्यांची निवड झाली आहे, त्यांना नियुक्ती देऊ शकते; पण मंत्रीमहदय केवळ बैठकाच घेत आहेत. आता दोन वर्षे होत येतील परीक्षा पास होऊन; पण राज्य सरकारला आमचे काहीच पडले नाही. आम्ही पूर्णपणे हतबल झालो आहोत, अशा शब्दात सचिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

COMMENTS