Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सह्याद्री सहकारी साखर कारखानासाठी आज मतदान

सातारा / प्रतिनिधी : कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, ता. कराड या साखर कारखान्य

हुंबरळी शाळेस कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा
फलटण येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; 12 जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रकाशच्या स्टाफवर दाखल गुन्हे राजकीय सुडबुध्दीने : मकरंद देशपांडे

सातारा / प्रतिनिधी : कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, ता. कराड या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुकीसाठी 4 एप्रिल रोजी मतदान तर ममोजणी 6 एप्रिल रोजी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुका हद्दीत सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, ता. कराड या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी उक्त नमूद केलेल्या तालुका हद्दीतील शस्त्र परवानाधारकांनी रहात असलेल्या घराच्या बाहेर शस्त्र घेवून बाहेर पडण्यास तसेच वरील तालुक्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील शस्त्र परवाना धारकांनी शस्त्रासह वर नमूद तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू केल्या आहेत.

COMMENTS