Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंजाबमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटबंना

अमृतसर : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरू असतांना संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानाचा जागर सुरू असतांना

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून तिरंग्याचा अवमान ; कारवाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार
वाघोलीतील वीजग्राहकांना नविन शाखांमुळे मिळणार दर्जेदार ग्राहक सेवा : राजेंद्र पवार
BREAKING: तहसीलदार अर्चना पागिरे यांचा अपघात की हत्येचा प्रयत्न…???? पहा Lok News24

अमृतसर : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरू असतांना संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानाचा जागर सुरू असतांनाच दुसरीकडे रविवारी पंजाबमधील अमृतसरमधे एका तरूणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडत त्याची विटंबना केली. पुतळा तोडण्यासाठी हा तरूण पुष्पहार अर्पण करण्यासाठी ठेवलेल्या शिडीवर तढला, त्यानंतर त्याने पुतळ्यावर हातोड्याने वार केले, त्यामुळे पुतळा तुटला. पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिमेचीही तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे, याप्रकरणी देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारानंतर लोकांनी तरुणाला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिस ठाण्यापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर असलेल्या हेरिटेज स्ट्रीटवर ही घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी हॉलगेट चौक बंद करून आंदोलन सुरू केले.

COMMENTS