Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर : विभागीय नाट्य संमेलनात नगरचे कलाकार सादर करणार विशेष स्वागतगीत

नगर:  नगरमध्ये दि.२६ व २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संमेलनानिमित्त नगरच

नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुखाला मिरवणुकीत गटबाजीचा राडा l पहा LokNews24
अकोले तालुक्यातून नंदिनी देशमुख मुलींमध्ये तालुक्यात प्रथम
मनपाचे वसुली कर्मचारी घेतात हप्ता ; सत्ताधारी नगरसेवकाचा महासभेत जाहीर आरोप

नगर:  नगरमध्ये दि.२६ व २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संमेलनानिमित्त नगरच्या कलाकारांनी विशेष स्वागतगीताची निर्मिती केली आहे. पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात संमेलन स्थळी सोमवार दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता १०० कलाकार स्वागतगीत सादर करणार आहेत. नाट्य संमेलनानिमित्त ‘गणपति रे…अधिपति रे..’ या स्वागतगीताची रचना संजोग धोत्रे यांनी केली असून पवन श्रीकांत नाईक यांनी हे स्वागतगीत संगीतबद्ध केले आहे.‌ अभिजीत अपस्तंभ, आदेश चव्हाण, अनिरुद्ध धर्माधिकारी, भार्गव देशपांडे, मूलांशु परदेशी, पवन श्रीकांत नाईक, अनुजा कुलकर्णी, ऋतुजा पाठक, अमृता बेडेकर, वर्षा पंडीत, संपदा चौधरी, अपर्णा बालटे व श्रेया सुवर्णपाठकी हे गायक – गायिका या स्वागतगीताचे गायन करणार आहेत. पवन श्रीकांत नाईक, ऋतुजा पाठक व अमृता बेडेकर हे संवादिनी वाद्याची संगत करणार असून प्रणव देशपांडे व कुलदीप चव्हाण हे सिंथेसायझर व बेंजो वाद्याची संगत करणार आहेत. तबला वाद्य संगत शेखर दरवडे व प्रसाद सुवर्णपाठकी यांचे असून सहवाद्य संगत श्रेयस शित्रे व राधिका परदेशी यांचे असणार आहे. ज्ञानदेव आढाव, नवरतन वर्मा, पवन तळेकर, सुशील परदेशी, वर्षा आढाव व त्रिमूर्ती कलशेट्टी हे मंचीय मदतनीस व्यवस्था पाहणार आहेत.

नगरच्या या ऐतिहासिक नाट्य संमेलनात रसिकांनी आवर्जून सहभागी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ.बापूसाहेब कांडेकर, निमंत्रक आमदार संग्राम जगताप, संमेलन प्रमुख  क्षितिज झावरे, उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर, प्रमुख कार्यवाह चैत्राली जावळे, मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, मध्यवर्ती नियामक मंडळ सदस्य संजय दळवी, अहिल्यानगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, कोषाध्यक्ष  जालिंदर शिंदे, मार्गदर्शक  पी. डी. कुलकर्णी व प्रसिद्धीप्रमुख अविनाश कराळे यांनी केले आहे.

COMMENTS