Homeताज्या बातम्यासंपादकीय

भारत-बांगलादेशातील तणाव !

भारत आणि बांगलादेश या शेजारी असलेल्या देशांचे संबंध गेल्या अनेक दशकांपासून चांगले राहिले आहेत. मात्र 15 वर्षांपासून सत्ताकेंद्र असलेल्या शेख हसीन

ओबीसी : राजकीय आरक्षण, जातनिहाय जणगणना ऐरणीवर ! 
राज ठाकरे यांचे तुणतुणे !
कुंकवाचा टिळा आणि स्त्री हक्क!

भारत आणि बांगलादेश या शेजारी असलेल्या देशांचे संबंध गेल्या अनेक दशकांपासून चांगले राहिले आहेत. मात्र 15 वर्षांपासून सत्ताकेंद्र असलेल्या शेख हसीना यांचे सरकार घालवल्यानंतर या संबंधाला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. खरंतर भारताने नेहमीच बांगलादेशासोबत सहकार्याची आणि मदतीचे संबंध ठेवले आहेत. बांगलादेश कधीही अडचणीत असल्यास सर्वप्रथम भारताने त्यांना मदत पुरवली आहे. असे असतांना दोन्ही देशांचे संबंध ताणतांना दिसून येत आहे, त्यात बांगलादेशलाच फटका बसणार आहे. या तणावामागचे प्रमुख आणि ताजे कारण म्हणजे भारताने दोन्ही देशांदरम्यान सीमेवर बांधण्यात येणार्‍या कुंपनावरून तणाव वाढतांना दिसून येत आहे. यासंर्दीात भारताने बांगलादेशातील उच्चायुक्त नुरल इस्लाम यांना समन्स बजावले आहे. भारताने दोन्ही सरकारांमधील सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेशमधील सीमा रक्षक यांच्यातील कुंपण घालण्यासंदर्भातील सर्व करारांचे पालन केले आहे. कुंपण कायदेशीर असून, त्याबाबत सर्व प्रोटोकॉल पाळण्यात आल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे भारताने आंतरराष्ट्रीय सीमेसंबंधी द्विपक्षीय कराराचे उल्लंघन केले आहे, असे आरोप बांगलादेशकडून करण्यात येत आहे. यावरून दोन्ही देशांत तणाव वाढतांना दिसून येत आहे. खरंतर बांगलादेश आणि भारताचे संबंध चांगले राहिले आहेत. कारण बांगलादेश स्वतंत्र होण्यात भारताची भूमिका महत्वाची होती, तिथंपासून आजपर्यंत या संबंधात नेहमीच सहकार्याची भूमिका राहिला आहे. मात्र बांगलादेशात सत्ताबदल झाल्यानंतर या संबंधात तणाव दिसून येत आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशात सर्वाधिक म्हणजे 4,096.7 किलोमीटरची सीमा आहे. जी पाकिस्तानपेक्षाही मोठी आहे. त्यात भारताच्या शेजारी असणारे देश म्हणजे पाकिस्तान आणि चीन या सीमारेषेचा वापर करून आपले घुसखोर या प्रदेशात पाठवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भारताने पुढील संभाव्य धोके लक्षात घेवून आपल्या सीमेवरील तटबंदी वाढवण्यास सुरूवात केली आहे. भारत एक बलाढ्य देश असल्यामुळे या देशांशी बांगलादेशच्या विद्यमान सरकारने जुळवून घेणे गरजेचे होते. मात्र शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यामुळे बांगलादेशचा जळफळाट झाला आहे. बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. युनूस अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळे बांगलादेशातील अर्थव्यवस्था रूळावर आणणे, भ्रष्टाचार कमी करणे यासारखी आव्हाने त्यांच्यासमोर असतांना ते अंतर्गत प्रश्‍नांवर काम करण्याऐवजी परराष्ट्रीय संबंध खराब करून चीनच्या जवळ जातांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे युनूस यांच्या या धोरणाला बांगलादेशातील नागरिकांचा पाठिंबा आहे, अशीही बाब नाही. कारण त्यांच्या धोरणाला अंतर्गत विरोध होतांना दिसून येत आहे. त्यामुळे युनूस यांनी आपला राजकीय दृष्टीकोन बदलण्याची मागणी बांगलादेशातच होतांना दिसून येत आहे. युनूस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याकाविरोधात मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले आहेत, हिंदू मंदिरावर हल्ले झाले आहेत, झुंडशाही वाढल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे बांगलादेशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर निर्माण झाला आहे, त्यामुळे याविरोधात भारत सरकारने बांगलादेशाला खडेबोल सुनावले आहेत. सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित करत भारताने ऑगस्टपासून बांगलादेशातल्या लोकांच्या व्हिजावरही मर्यादा आणल्यात. पण आपत्कालिन व्हिजा अजूनही दिले जात आहेत आणि त्यात वाढ करणार असल्याचं आश्‍वासनही देण्यात आले आहे. असे असतांना देखील बांगलादेश कठोर भूमिका घेतांना दिसून येत आहे. खरंतर बांगलादेशाची अर्थव्यवस्था इतकी भक्कम नाही, त्यासोबतच इथं अन्न-धान्याचा प्रश्‍न गंभीर होतांना दिसून येत आहे. तरीही या संबंधातील तणावात भारताने बांगलादेशला मोठ्या प्रमाणावर तांदूळाची निर्यात केली आहे. त्यामुळे घरात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशीच परिस्थिती बांगलादेशाची दिसून येत आहे. खरंतर प्रत्येक देशाला आपला आत्मसन्मान आणि सीमांचे रक्षण करण्याचा हक्क आहे, तो त्यांनी राखलाच पाहिजे, मात्र विनाकारण कोणत्याही देशांच्या कच्छपी लागून एखाद्या देशांसोबत आपले अनेक वर्षांपासूनचे संबंध खराब करून घेणे म्हणजे शुद्ध मुर्खपणाचे लक्षण आहे.

COMMENTS