देशभरात महिला अत्याचारात 30 टक्के वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशभरात महिला अत्याचारात 30 टक्के वाढ

नवी दिल्ली : देशभरात महिला अत्याचारात वाढ झाली असून, गेल्या वर्षी तब्बल 31 हजार महिला अत्याचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रीय महिला आ

शंखी गोगलगायीमुळे नुकसानीची भरपाई देणार, समिती स्थापणार : मंत्री अब्दुल सत्तार
भाजपच्या 21 नगरसेवकांसह 114 जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (Video)
मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे मुघलशाही…पडळकरांची परबांवर टीका | LOKNews24

नवी दिल्ली : देशभरात महिला अत्याचारात वाढ झाली असून, गेल्या वर्षी तब्बल 31 हजार महिला अत्याचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाने दिली आहे. 2014 नंतर सर्वाधिक तक्रारी 2021 मध्ये नोंदवण्यात आल्याचे देखील आयोगाने स्पष्ट केले. एकूण तक्रारींपैकी अर्ध्याहून अधिक तक्रारी एकट्या उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आल्या.
राष्ट्रीय महिला आयोगानूसार, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये महिलांविरोधातील अत्याचाराच्या तक्रारींमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. एनसीडब्ल्यूच्या आकडेवारीनूसार 30 हजार 864 तक्रारींपैकी 11 हजार 13 तक्रारी महिलांच्या भावनात्मक शोषण लक्षात घेता त्यांना सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकारासंबंधी होती. घरगुती हिंसाचाराशी संबंधीत 6,633 तसेच हुंड्यासाठीच्या जाचासंबंधी 4 हजार 589 तक्रारी प्राप्त झाल्या.सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात महिलांविरोधात गुन्ह्यांसंबंधी सर्वाधिक 15 हजार 8228 तक्रारी प्राप्त झाल्या. उत्तर प्रदेश पाठोपाठ दिल्ली 3,336, महाराष्ट्र 1,504, हरियाणा 1,460, तसेच बिहारमध्ये 1 हजार 456 तक्रारी वर्षभरात मिळाल्या. 2014 नंतर एनसीडब्ल्यू ला 2020 मध्ये सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या. 2014 मध्ये 33 हजार 906 तक्रारी मिळाल्या होत्या. आयोगाच्या कार्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यात आल्याने तक्रारींच्या संख्येत वाढ झाल्याचे मत एनसीडब्ल्यू प्रमुख रेखा शर्मा यांनी व्यक्त केले आहे. 2020 मध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान महिन्याकाठी 3 हजार 100 हून अधिक तक्रारी मिळाल्या. नोव्हेंबर 2018 मध्ये ‘मी टू आंदोलन’ चालवले जात असतांना 3 हजार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS