Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवरी पसंद पण नवरदेवाला हवा हुंडा :आमदार रोहित पवारांचा टोला

पाथर्डी : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळून आठ दिवस उलटून गेले असून तरी देखील सरकार स्थापन झालेले नसून नवरी पसंत आहे. पण नवरद

एक्सपायरी संपलेल्या बाटल्यांवर नवं स्टिकर लावून रेमडेसिव्हीरची विक्री |’१२च्या १२बातम्या’ |LokNews24
फडणवीसांचा हल्लाबोल महाराष्ट्रात लोकशाही नाही, ‘लॉकशाही’ आहे; | ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | LokNews24
राहुरी कॉलेजमधील शेकडो झाडांना आस पाण्याची

पाथर्डी : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळून आठ दिवस उलटून गेले असून तरी देखील सरकार स्थापन झालेले नसून नवरी पसंत आहे. पण नवरदेवाला हुंडा पाहिजे अशी परिस्थिती सध्या महायुतीची झाली असल्याचे प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते 222 शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार अँड. प्रताप ढाकणे यांनी शहरातील वीर सावरकर मैदान येथे जाहीर आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलत होते.
या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, अँड. प्रताप ढाकणे, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे नासीर शेख, राजू दौंड, महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, सविता भापकर, बंडू पाटील बोरुडे, वैभव दहिफळे, आपचे सुभाष केकान, सीताराम बोरुडे, देवा पवार, योगेश रासने, माऊली केळगंद्रे, रामराव चव्हाण, किसन आव्हाड, अजित मेहेर, सचिन नागापुरे यासह शेवगाव-पाथर्डीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार रोहित पवार यांनी म्हटले की, लोकसभेच्या निकालानंतर केंद्राच्या सत्तेसाठी घाबरून महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येऊ नये यासाठी मोठी ताकत उभी करण्यात आली. निवडणुकीत आपण शेतकरी, बेरोजगारी, शिक्षणाबद्दल बोललो पण भाजपाने कटेगे तो बटेगे चा नारा देत जाती धर्मामध्ये महाराष्ट्राला विभागून भाजपाने सत्तेत येण्याचा प्रयत्न केला असून लोकशाही टिकली नाही तर सर्वसामान्याचे प्रश्‍न कोणी मांडणार नाहीत. महायुतीने रडीचा डाव खेळला असून आपण लढून जिंकलोय पण या ईव्हीएमच्या घोळामुळे आपण हरलोय ही गोष्ट मनात ठेवून महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे रहा असे यावेळी बोलताना ढाकणे यांनी म्हटले की, शेवगाव पाथर्डी मतदारसंघात चार महिन्यांत 15064 बाळ जन्माला येऊन चार महिन्यांत 18 वर्षाची झाली असल्याचा चमत्कार झाला आहे. मला लोकांनी निवडून दिले असून मी तांत्रिकदृष्ट्या पराभूत झालो असून येणार्‍या काळात वंचित आणि व्यापारी वर्गाच्या प्रश्‍नांसाठी लढणार आहे.2029 ला बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली नाही तर देशातील समाजव्यवस्था संपून आरक्षण बंद होईल असे शेवटी ढाकणे म्हणाले.

ईव्हीएम मशीनची केली प्रतीकात्मक होळी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप,शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तरी लोकसभेच्या तुलनेत महाविकास आघाडीला मोठा फटका विधानसभेमध्ये बसला आहे. हा फटका ईव्हीएममुळे बसल्याचा आरोप महाविकास आघाडीतून केला जात आहे.ईव्हीएमच्या विरोधात महाविकासआघाडी आक्रमक झाली असून शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात याची पहिली ठिणगी पडली आहे.र ाष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार व अँड.प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक होळी करून ईव्हीएम विरोधात राज्यातील पहिले आंदोलन करण्यात आले आहे.

COMMENTS