देशाच्या वित्त मंत्री निर्मला सितारामन् या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या विषयावर चर्चेत आले, तर, त्यांना विरोध क
देशाच्या वित्त मंत्री निर्मला सितारामन् या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या विषयावर चर्चेत आले, तर, त्यांना विरोध करण्याचे किंवा त्यांच्यावर टिका करण्याचे कारण राहणार नाही; परंतु, त्या अर्थव्यवस्था आणि अर्थकारण सोडून इतर विषयांवर चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी ‘ पुरूषसत्ताक ‘ शब्द ही कम्युनिस्टांची देन आहे किंवा शोध आहे, अशा प्रकारचा आरोप वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लावला. अर्थात, अर्थव्यवस्थेमधील कामगिरी देशाच्या जनतेच्या उत्थानाची बजावू शकले नसले तरी, त्यांच्या पद्धतीने सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांची मांडणी करायला जातात; तो केवळ त्यांच्या सांस्कृतिक संस्कारांचा भाग आहे! पुरुषसत्ताक व्यवस्था ही या देशामध्ये प्राचीन काळापासून अवतरलेली व्यवस्था आहे. रामायणाचे अनेक प्रकारचे लेखन झाले आहे. मात्र, रामायणातील राम-रावण युद्ध यावर देखील अनेक प्रकारची भाष्य झाली आहेत. रावण हे ब्रह्मण होते आणि ब्रह्मण याचा अर्थ स्त्रीसत्ताक व्यवस्थेचा पुरस्कार करणारे आणि दुसऱ्या बाजूला राम हे क्षेत्रीय होते; तरी, त्यांच्या माध्यमातून विविध प्रयत्न झाले. ते एक प्रकारे पुरुषसत्तेचा पुरस्कार करणारे होते. त्यामुळे, स्त्रीसत्ताक व्यवस्था आणि पुरुष सत्ताक व्यवस्था यांच्या मधला एक संघर्ष म्हणूनही रामायणातील राम-रावण युद्धाकडे पाहिले जाते, असेही ऐतिहासिक काही रामायण आणि सांस्कृतिक मांडणीमध्ये म्हटले जाते. तर, दुसऱ्या बाजूला पुरुष सूक्त जे आहेत त्यांची रचनाच मुळात पुरुषांच्या सत्तेसाठी केली गेली आहे. ज्या ज्या वेळी पुरुषसूक्त सूत्र म्हटले जातात, त्यावेळी त्यांचा अन्वयार्थ पुरुषांच्या मक्तेदारीचा दिसतो; असे अनेक इतिहासकार आणि तत्वज्ञ मांडणी करतात. मात्र, पुरुषसत्ताक हा शब्दच कम्युनिस्टांनी आणला, अशा प्रकारची मांडणी करणे, हे एक प्रकारे एवढ्या मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीच्या ज्ञानाच्या गंभीरतेशी विसंगत असल्याचे द्योतक आहे. कोणत्याही देशाच्या इतिहास, संस्कृती आणि तत्वज्ञानाचा पायाभरणी होत असताना त्या देशाचा सांस्कृतिक आणि सत्ता संघर्ष दोन्हीही एकमेकांशी लढत असताना एकमेकांना पूरक होत विकसित होत जातात. आपल्या देशात पुरुषसत्ताक व्यवस्था आणण्याचे मुख्य कारण, स्त्रियांनी शेतीचा शोध लावल्याचे प्राच्यविद्या पंडितांनी म्हटले आहे. ज्या संसाधनांचा किंवा साधनांची मालकी ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे सत्तेची सूत्र असतात. शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रियांकडे शेतीचा मालकी हक्क होता. त्यामुळे, त्या मालकी हक्कामुळे पुरुषांना कुठल्याही प्रकारचा हिश्याचा अधिकार नव्हता. परंतु, स्त्रियांनी मात्र आपल्या मालकीच्या शेतीत उत्पादित मालाचे समान वाटप आपल्या कुटुंबातील सदस्यांना करण्याचे धोरण, कायम अवलंबले आणि त्यामुळे स्त्रीसत्ताक व्यवस्था किंवा मातृसत्ताक व्यवस्था ही समतावादी असते, हे या देशाच्या प्राचीन इतिहासातच स्पष्ट झाले; तर, दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या कडे जेव्हा शेतामध्ये बैल राबवण्याची कल्पकता आली आणि शेतीचे उत्पादन कैकपटींनी वाढले, त्यावेळी पुरुषांना असे वाटले की, शेती मधल्या आपल्या कल्पकतेने उत्पादन हे वाढीला लागले आणि म्हणून शेतीच्या मालकी हक्कावरून पहिला संघर्ष स्त्री-पुरुष यांच्यात झाला. या व्यवस्थेमध्ये जे जे संघर्ष झाले, त्या संघर्षामध्ये पुरुषांनी आपली मालकी प्रस्थापित करण्यासाठी व्यवस्थेला आपल्या अनुषंगाने घडवलं आणि यामध्ये पुरुषांचा सहभाग आहे असे नाही तर हा सांस्कृतिक संघर्ष आहे. याच देशातील शेती करणारे आणि शेती न करणारे यांच्यामधला हा संघर्ष आहे. शेती न करणारे हे पुरुष सत्ताकवादी आहेत, तर, शेती करणारे हे मातृसत्ताक किंवा स्त्रीसत्ताकवादी आहेत, असे अनेक प्राचय विद्या पंडीतांनी इतिहासात नमूद केले आहे. याचा अर्थ केवळ शंभर वर्षांपूर्वी उदयाला आलेल्या कम्युनिस्टांची विचारधारा ही पुरुषसत्ताक व्यवस्थेचा शब्द शोधून काढते, यावर मात्र वेंधळा असणारा ही व्यक्ती विश्वास ठेवणार नाही; इतकं हलक्या दर्जाचं वक्तव्य, आपल्या देशातील वित्तमंत्री यांनी केले आहे.
COMMENTS