Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिरवा-जिरवीसाठी विरोधकांनी पदाचा वापर : ना. अजित पवार

आष्टा / वार्ताहर : आ. जयंत पाटील यांना 35 वर्षात मतदार संघाचा चौफेर विकास साधता आला असता. परंतू त्यांनी आपलेला मिळालेल्या पदाचा व सत्तेचा वापर

गोंदवले येथील फर्निचरच्या शोरुमला भीषण आग; लाखोचे नुकसान; चारजण जखमी
फास्ट टॅग स्कॅन होण्यास अडचण; आनेवाडी टोलनाक्यावर वाहनचालकास मारहाण
शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; राजकीय वादातून हल्ला झाल्याची चर्चा

आष्टा / वार्ताहर : आ. जयंत पाटील यांना 35 वर्षात मतदार संघाचा चौफेर विकास साधता आला असता. परंतू त्यांनी आपलेला मिळालेल्या पदाचा व सत्तेचा वापर फक्त त्यांना राजकारणात ओव्हरटेक करणार्‍यांची जिरवा-जीरावी करण्यासाठी त्यांना राजकारणातून कायमचे संपवण्यासाठी व दुसर्‍याच्या संस्था लुटण्यासाठी केला. आजपर्यंत ते फक्त गलिच्छ राजकारण करत आले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
आष्टा येथे इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खा. धैर्यशील माने, आनंदराव पवार, प्रभाकर जगदाळे, पृथ्वीराज पवार, सी. बी. पाटील, राहुल महाडिक, गौरव नायकवडी, प्रसाद पाटील, भीमराव माने, केदार पाटील, अशोक पराडकर, सागर खोत, सागर मलगुंडे, विक्रम पाटील, प्रवीण माने, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.
ना. अजित पवार म्हणाले, स्व. विलासराव शिंदे यांच्या बरोबर मी काम केले आहे. त्यांनी या भागाचा विकास केला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून पुढे जात आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो. आता आमच्या चुका आम्ही सुधारल्या आहेत. येथील लोकप्रतिनिधीना 35 वर्षे तुम्ही निवडून दिले. पण त्यांना येथे एमआयडीसी उभारता आली नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. इस्लामपूर व आष्टा बसस्थानकाची काय अवस्था आहे हि मी सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला तालुक्यातील महापुरुषांची स्मारके करता आली नाहीत. रिकव्हरी प्रमाणे दर द्यायचा झाला तर 3800 रुपये टनाला येथील शेतकर्‍याला मिळायला पाहिजेत. दिवाळी सर्वांना सोबत घेऊन गोडधोड करायची असते. स्वतःच करून खायची नसते. तुम्हाला साधी मतदार संघातील लोकांची दिवाळी साजरी करता येत नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघता. ऊस दर देण्यात स्पर्धा असावी. व्यक्तिगत स्वार्थ साधणारी स्पर्धा नसावी. तुम्ही जलसंपदा मंत्री होता. तुमच्या मतदार संघातून नदी गेली आहे. तरीही तुम्हाला जनतेला पाणी देता आलं नाही, हे येथील लोकांचे दुर्देव आहे. मतदार संघाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी खमक्या असावा लागतो. निशिकांतदादांना या निवडणुकीत निवडून द्या.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, येथे एका नेत्याच्या विरोधामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा राहिला नाही. सन 1978 ला स्व. राजारामबापू पाटील यांच्या पराभवामुळे हे शहर विकासापासून जाणून बुजून वंचित ठेवले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही आण्णा भाऊ साठे व स्व. विलासराव शिंदे यांचा पुतळा बसवण्यासाठी मी पाठपुरावा करेन. स्व. शिंदेसाहेब यांनी हा तालुका सुजलाम् सुफलाम् व्हावा, यासाठी संघर्ष संपवला.
प्रचार सभेत राहुल महाडिक, गौरव नायकवडी, पृथ्वीराज पवार यांनी मनोमग व्यक्त केले.

हे निघाले राज्याचे नेतृत्व करायला
आ. जयंत पाटील यांना त्याच्या मूळ गाव कासेगाव येथे पोलिस ठाण्याची इमारत उभी करता आली नाही. ते पोलीस ठाणे आज ही भाड्याच्या इमारतीत आहे. पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्‍न तर तुम्ही सोडाच. आणि म्हणे हे राज्याचे नेतृव करायला निघाले आहेत. कशाला का सगळी पोलिस ठाणी भाड्याच्या घरात करायची आहेत यांना. येथे चांगले रस्ते नसल्याने अनेक जणांनी जीव गमवावे लागले. सूतगिरणी सुध्दा तुम्ही बंद पडल्या. तुमची नातीगोती चांगली आहेत. पाहुण्यांना सांगून एखादी कंपनी मतदार संघात निर्माण करून तरुणांना रोजगार तुम्हाला देता आला असता, असा टोलाही ना. अजित पवार यांनी जयंत पाटील यांना लगावला.

COMMENTS