Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागृत शेतकरी अपप्रचारास बळी पडणार नाही : आ. जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : विरोधकांना माझ्या विरोधात बोलण्यास काहीच जागा नसल्याने ते ऊस दराचा अप प्रचार करून शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत. मात्र

सज्जनगडावर लवकरच रोप-वे; 10 कोटींचा निधी मंजूर
स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही : ना. अजित पवार
सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. राजाराम माने

इस्लामपूर / प्रतिनिधी : विरोधकांना माझ्या विरोधात बोलण्यास काहीच जागा नसल्याने ते ऊस दराचा अप प्रचार करून शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत. मात्र आमचा सुज्ञ व जागृत शेतकरी त्यांच्या अपप्रचारास बळी पडणार नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांनी रेठरे हरणाक्ष येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. भाजपा महायुतीच्या सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
आ. पाटील म्हणाले, राज्यात जे काही चांगले साखर कारखाने चालले आहेत, त्यात आपला कारखाना आहे. स्व. बापूंनी आपणास जो आदर्श घालून दिला आहे, त्याप्रमाणे आपण काटकसर व पारदर्शी कारभार करत सामान्य माणूस व शेतकर्‍यांचे हित साधत आहे. सध्या राज्यावर पावणेआठ लाख कोटींचे कर्ज आहे. मात्र, या सरकारने सवंग लोकप्रियतेसाठी ज्या घोषणा केल्या, त्यामुळे राज्याची तिजोरी खाली झाली आहे. या सरकारने सव्वालाख कोटींच्या कर्जाची रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली आहे. म्हणजे राज्यातील प्रत्येक माणसावर 65-70 हजार रुपयांचे कर्ज केलेले आहे.
सुस्मिता जाधव म्हणाल्या, लोकसभेच्या दणक्यानंतर राज्यातील महिला लाडक्या बहिणी झाल्या. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेचे काय? आ. जयंत पाटील यांनी महिलांना रोजगार आणि विविध पदावर काम करण्याची संधी दिली आहे.
सुनिता देशमाने म्हणाल्या, आ. जयंत पाटील यांनी गेल्या 35 वर्षात तालुक्याचा शाश्‍वत विकास केला आहे. माजी पं. स. सदस्य सुरेश पंडीत पवार, सेवा निवृत्त प्राचार्य बी. एन. पवार, डॉ. जयकर शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केली.
प्रारंभी अ‍ॅड. विवेकानंद मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या सभेस दामाजी मोरे, विश्‍वास मोरे, महेश पवार, पंकज पवार, सोसायटीचे अध्यक्ष हणमंत मोरे, केदार शिंदे, चंद्रहार पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश पवार यांनी आभार मानले.

COMMENTS